Conjunction Of Saturn And Venus saam tv
राशिभविष्य

Shukra-shani Yuti: दिवाळीनंतर होणार शुक्र-शनीचा संयोग; 'या' राशी होणार धनवान, करिअरमध्ये सुवर्णसंधी!

Conjunction Of Saturn And Venus 2024: यंदाच्या दिवाळी सणानंतर शुक्र आणि शनी यांची युती होणार आहे. तब्बल ३० वर्षांनंतर ही युती होणार असल्याने ती फार खास मानली जातेय.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, येत्या ३१ ऑक्टोबर रोजी संपूर्ण देशात दिवाळीचा सण साजरा केला जाणार आहे. यंदाचा दिवाळीचा सण ज्योतिष्य शास्त्राच्या हिशोबाने देखील फार महत्त्वाचा आहे. शास्त्रानुसार, यंदाच्या दिवाळी सणानंतर शुक्र आणि शनी यांची युती होणार आहे. तब्बल ३० वर्षांनंतर ही युती होणार असल्याने ती फार खास मानली जातेय.

शनिदेवाने 30 वर्षांनी कुंभ राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे शनि आणि शुक्राच्या संयोगामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे. या काळात काही लोकांना आर्थिक लाभ मिळणार आहे. तर काही राशींना चांगल्या संधी मिळणार आहेत. शुक्र आणि शनीच्या युतीचा कोणत्या राशींवर सकारात्मक परिणाम होणार आहे ते पाहूयात.

मेष रास

शुक्र आणि शनिदेव यांची जोडी तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना गुंतवणुकीचा फायदा होऊ शकतो. एखादा महत्त्वाचा व्यवसाय करार होणार आहे. उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठीही काळ चांगला राहणार आहे.

कुंभ रास

शुक्र आणि शनीची युती या राशींच्या व्यक्तींसाठी फार लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमचं वैयक्तिक जीवन सुधारणार आहे. वडिलांकडूनही तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. तुम्हाला भागीदारीच्या कामात लाभ मिळू शकणार आहे. तुमचं पद आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अचानक भरपूर चांगल्या संधी उपलब्ध होतील.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी शुक्र आणि शनीचा संयोग शुभ ठरू शकणार आहे. यावेळी नशीब तुमच्या बाजूने असू शकणार आहे. या काळात विद्यार्थ्यांना पूर्वीपेक्षा चांगले निकाल मिळणार आहेत. व्यावसायिकांना चांगला आर्थिक नफा होऊ शकतो. कर्मचाऱ्यांची कार्यशैलीही सुधारणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mardaani 3 : हरवलेल्या मुली, भयावह कट आणि शिवानी रॉय; सस्पेन्सने भरलेला ‘मर्दानी 3’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित

Maharashtra Live News Update : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम पालघरमध्ये शेतकऱ्यांनी रोखलं

Crime: तरुणीला बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत पकडलं, कुटुंबीयांकडून विटा-दगड अन् काठ्यांनी बेदम मारहाण; दोघांचा मृत्यू

Vachana Dile Tu Mala: 'वचन दिले तू मला' मालिकेत ऊर्जाची पहिली लढाई; उज्ज्वल निकमचा आशीर्वाद घेऊन उतरणार न्यायाच्या रणांगणात

BloodPressure : घरी BP नॉर्मल, डॉक्टरांकडे जाताच का वाढतो? कारणे आणि चुकीच्या सवयी समजून घ्या

SCROLL FOR NEXT