Shurka Uday 2025 saam tv
राशिभविष्य

Shurka Uday: धनदाता शुक्राच्या उदयामुळे बनणार पंच महापुरुष राजयोग; 'या' राशींच्या व्यक्तींवर पडणार पैशांचा पाऊस

Shurka Uday 2025: २३ मार्च रोजी सकाळी ५:४९ वाजता उदय होणार आहे. यामुळे मालव्य राजयोग निर्माण होणार आहे. अशा परिस्थितीत काही राशींना भरपूर फायदे मिळू शकतात.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतो. यामध्ये शुक्र ग्रहाला विशेष स्थान देण्यात आलं आहे. मुळात राक्षसांचा गुरु शुक्र हा संपत्ती, समृद्धी, आनंद यांचा कारक मानला जातो. शुक्राच्या स्थितीत होणारा बदल प्रत्येक राशीवर काही ना काही परिणाम करतो.

संपत्तीचा कर्ता शुक्र मीन राशीत आहे आणि ती परिस्थिती एका विशिष्ट कालावधीनंतर बदलणार आहे. होळीनंतर शुक्र ग्रह अस्त होणार आहे. २३ मार्च रोजी सकाळी ५:४९ वाजता उदय होणार आहे. यामुळे मालव्य राजयोग निर्माण होणार आहे. अशा परिस्थितीत काही राशींना भरपूर फायदे मिळू शकतात. जाणून घेऊया यावेळी कोणत्या राशींना फायदा होणार आहे.

धनु रास

या राशीच्या लोकांसाठी, शुक्र ग्रहाचा उदय आणि मालव्य राजयोगाची निर्मिती अनुकूल असणार आहे. या राशीच्या चौथ्या घरात शुक्र ग्रहाचा उदय होणार आहे. या राशीच्या लोकांच्या सुखसोयींमध्ये झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामं पूर्ण होऊ शकतात. यामुळे वाहन, कार, मालमत्ता किंवा घर खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकतं.

मिथुन रास

या राशीच्या लोकांसाठी शुक्र ग्रहाचा उदय आणि मालव्य राजयोगाची निर्मिती फायदेशीर ठरू शकणार आहे. करिअरच्या क्षेत्रातही तुम्हाला खूप फायदे मिळू शकतात. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकणार आहे. हा काळ नातेसंबंधांसाठी फायदेशीर ठरू शकतो.

मकर रास

या राशीत, शुक्र तिसऱ्या घरात उदय होणार आहे. तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांमुळे तुम्ही खूप यशस्वी होऊ शकता. जर तुम्ही बऱ्याच काळापासून कोणत्याही कामावर कठोर परिश्रम करत असाल तर आता तुम्हाला त्यात यश मिळू शकणार आहे. तुमच्या कारकिर्दीत तुम्हाला महत्त्वाचे बदल दिसू शकतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कुर्ल्यातील एलबीएस मार्गावरील हॉटेलला आग

शेतकऱ्यांच्या खात्यात थेट २० हजार कोटींची मदत जमा – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती|VIDEO

Real cause of breast pain: स्तनात जाणवणाऱ्या वेदनांचं खरं कारण काय? डॉक्टरांनी सांगितला महिलांसाठी महत्त्वाचा इशारा

Shocking News : डोंबिवलीत हत्येचा थरार! किरकोळ कारणावरून तरुणाची हत्या, पोलिसांनी काही तासात आवळल्या हल्लेखोरांच्या मुसक्या

Pawna Lake Tourism: बजेट कमी आहे? 'या' ठिकाणी करा ट्रीप, कुल्लू मनाली विसराल

SCROLL FOR NEXT