Shukra Gochar saam Tv
राशिभविष्य

Shukra Vakri: होळीपूर्वी शुक्र ग्रह चालणार वक्री चाल; 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस, नवी नोकरीही मिळणार

Shukra Vakri In Pisces: शुक्राच्या हालचालीत बदल आणि त्याची वक्री चाल त्याच्या उच्च राशी मीन राशी होणार आहे. अशा परिस्थितीत काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रामध्ये हिंदू धर्मातील सणांना विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. मार्चमध्ये होळीचा सण असून या दिवसाच्या अगोदर काही राशींसाठी ग्रहांची स्थिती शुभ मानली जातेय. या वर्षी होळीचा सण १४ मार्च रोजी आहे, परंतु त्याच्या काही दिवस आधी शुक्र ग्रह आपली चाल बदलणार आहे. होळीच्या आधी संपत्ती आणि समृद्धीचा कारक शुक्र ग्रह २ मार्च रोजी वक्री चाल चालणार आहे

शुक्राच्या हालचालीत बदल आणि त्याची वक्री चाल त्याच्या उच्च राशी मीन राशी होणार आहे. अशा परिस्थितीत काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. यावेळी मीन राशीत शुक्राच्या हालचालीतील बदल आणि त्याच्या वक्री गतीचा तीन राशींवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. यामध्ये काही राशींच्या संपत्तीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. तर काही राशींच्या बुद्धिमत्तेतही वाढ होऊ शकते. जाणून घेऊया यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांना शुक्राच्या वक्री गतीमुळे विशेष फायदे मिळू शकणार आहे. या काळात व्यक्तीचे नशीब चमकू शकणार आहे. त्या व्यक्तीला धार्मिक कार्यात विशेष रस असू शकतो. तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात.

धनु रास

धनु राशीच्या लोकांसाठी शुक्राची वक्री चाल चांगल्या काळाची सुरुवात दर्शवू शकते. नोकरीच्या शोधात असलेल्यांना या काळात चांगली बातमी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी पदोन्नतीची शक्यता राहणार आहे. आर्थिक परिस्थिती मजबूत होणार आहे. तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.

मीन रास

शुक्राची वक्रदृष्टी मीन राशीच्या लोकांना खूप फायदे देऊ शकते. व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वात अद्भुत सुधारणा होण्याची शक्यता आहे. प्रेम जीवनात सुधारणा होण्यासोबतच गोडवा देखील वाढू शकतो. करिअर आणि व्यवसायात सकारात्मक बदल होऊ शकतात. विवाहित लोकांमध्ये प्रेम वाढणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Govinda: बायकोच्या 'त्या' विधानावरून अभिनेता गोविंदानं मागितली सार्वजनिक माफी, काय आहे प्रकरण?

नाशिकमध्ये तब्बल 3 लाख दुबार मतदार; बोगस मतदारविरोधात शिंदेसेनाच मैदानात

Election Commission: नगर परिषद, नगर पंचायती निवडणूक; उमेदवारांना किती पैसे खर्च करता येतील?

Fact Check : मुंबईतील सोसायट्यांमध्ये फिरतंय भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Junnar leopard Attack : बिबट- माणसांचा संघर्ष उफाळला, पुण्यात बिबट्यानं घेतला 60 जणांचा बळी; नागरिक म्हणतात गोळ्याच घाला

SCROLL FOR NEXT