Navpancham Rajyog saam tv
राशिभविष्य

Navpancham Rajyog: आज रात्रीपासून 'या' ३ राशी होणार मालामाल; शुक्र ग्रह बनवणार पॉवरफुल योग

Navpancham Rajyog 2025: आज रात्री, ऐश्वर्य, संपत्ती आणि वैभवाचा कारक मानला जाणारा शुक्र ग्रह, एका शक्तिशाली स्थितीमुळे ‘नवपंचम राजयोग’ तयार करत आहे. या राजयोगामुळे काही राशींना चांगला फायदा मिळणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषानुसार, नवग्रहांमध्ये प्रत्येक ग्रहाला एक विशेष महत्त्व देण्यात आलंय. यामध्ये शुक्र हा नवग्रहांमध्ये अत्यंत प्रभावशाली ग्रह मानला जातो. शुक्र हा ग्रह एकंदरीत 26 दिवसांनी तो एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. यामध्ये तो साधारणपणे वर्षातून एकदा पुन्हा त्याच राशीत परत येतो.

ज्यावेळी शुक्र एखाद्या राशीत प्रवेश करतो त्यावेळी इतर ग्रहांसोबत त्याची युती होत असते. यामुळे विशेष योगांची निर्मिती होणार, जे व्यक्तीच्या जीवनावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम करू शकणार आहेत. ऑक्टोबर महिन्यात शुक्र कन्या राशीत विराजमान राहणार आहे. यावेळी तो युरेनस शिवाय प्लूटो ग्रहासोबत विशेष संयोग करणार आहे. यामुळे नवपंचम राजयोगाचा निर्माण होणार आहे. या शक्तिशाली योगाच्या प्रभावामुळे काही राशींना विशेष भाग्यसंधी मिळणार आहे.

नवपंचम राजयोगाचा कोणत्या राशींवर सर्वाधिक परिणाम होणार?

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, 14 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजून 14 मिनिटांनी शुक्र आणि प्लुटो हे ग्रह एकमेकांपासून 120 अंशांच्या अंतरावर येणार आहेत. त्याचवेळी नवपंचम राजयोग तयार होणार आहे.

वृषभ राशी (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा योग अत्यंत शुभदायी ठरू शकणार आहे. या काळात आर्थिक स्थिती मजबूत होण्याची दाट शक्यता आहे. घरात आनंदाचे वातावरण तयार होणार आहे. विवाह किंवा कुठल्याही शुभ प्रसंगासाठी हा काळ योग्य राहू शकणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रत्येकाची मदत तुम्हाला मिळणार आहे

मकर राशी (Capricorn)

मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ प्रगतीचा मार्ग खुला करणारा असणार आहे. खूप दिवसांपासून अडकलेली कामं आता मार्गी लागणार आहेत. नोकरी करणाऱ्यांना मोठा फायदा होऊ शकणार आहे. धार्मिक प्रवासाची संधी मिळू शकणार आहे. घरात शुभकार्य होण्याचे योग आहेत.

वृश्चिक राशी (Scorpio)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग अत्यंत लाभदायक ठरू शकतो. जीवनात नवीन आनंद येऊ शकणार आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना या काळात पगारवाढ मिळू शकणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वात आत्मविश्वासाची वाढ होणार आहे. जुनी समस्या सुटणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ayushman Bharat card: घर बसल्या कसं काढू शकता आयुष्मान भारत कार्ड

Court : कोर्टात सरकारी वकिलाला मारहाण! थेट चेंबरमध्ये घुसून बेदम मारलं, बूट फेकून मारला

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दरेगावी आगमन

BMC Election Explainer : मुंबईत ठाकरेंचीच सरशी? महायुतीचं टेन्शन वाढलं; ७० वॉर्ड निर्णायक, राज ठाकरे किंगमेकर ठरणार?

सिल्की आणि शाईनी केसांसाठी आता घरच्या घरी करा हेअर स्पा

SCROLL FOR NEXT