Horoscope saam tv
राशिभविष्य

Tuesday Horoscope : आयुष्याला वेगळं वळण मिळणार; 'या' राशींच्या लोकांना फायदा होणार, तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Tuesday Horoscope in Marathi : आज काही राशींच्या लोकांच्या आयुष्याला वेगळं वळण मिळणार आहे. काहींना मोठा फायदा होणार आहे.

Anjali Potdar

आजचे राशीभविष्य

मंगळवार,२२जुलै २०२५,आषाढ कृष्ण पक्ष,

भौमप्रदोष.

तिथी-द्वादशी ०७|०६

त्रयोदशी २८|४०

रास-वृषभ ०८|१५ नं. मिथुन

नक्षत्र-मृग

योग-ध्रुव

करण-तैतिल ०७|०६

गरज १७|५२

दिनविशेष-क्षयतिथी

मेष - महत्त्वाच्या बैठका आणि निर्णय आज पार पडतील. पैशाची आवक जावक चांगली असल्यामुळे मनस्थिती चांगली राहील. जोडीदाराच्या तब्येतीची मात्र आज काळजी घ्यावी लागेल.

वृषभ - "हम करे सो कायदा" असा काहीसा दिवस आहे. आपल्याला मनाला वाटेल तसेच्या तसेच आज जगाल. वेगळे वळण आणि आनंदी वाटा घेऊन आलेला आजचा दिवस आहे. आपला इतरांवर प्रभाव राहील.

मिथुन- कधी कधी ठरवलेल्या गोष्टी तसेच जीवनात होत नाहीत हे आपल्याला चांगलेच माहिती आहे. आपण न केलेल्या गोष्टीचा आपल्यावर आळ येईल. मानसिक अस्वस्थता राहील.आध्यात्मिक बैठक याच्यातून मार्ग काढायला मदत करेल.

कर्क - प्रेमाने जोडलेल्या लोकांच्या मुळे आज दिवस कृतकृत्य झाल्यासारखा वाटेल. मित्र-मैत्रिणींच्या गोतावळ्यामध्ये रहाल. स्नेहभोजनाचे योग आहेत. दिवस चांगला आहे.

सिंह - कर्मानुसार फळ मिळते हे आपल्याला माहिती आहे. आपण कर्माला कधीच चुकत नाही. उदारता आणि दानशूरता आज आपली वाढती राहील. लोकांच्या मध्ये त्यामुळे आपल्याविषयी आदर निर्माण होईल. दिवस चांगला आहे .

कन्या - विष्णू उपासना महत्वाची ठरेल. मनात योजलेल्या गोष्टी घडताना बघून आनंद वाटेल.चांगल्या घटनांचा कालावधी आहे. दिवस सुखी समाधानी राहील .

तूळ - अचानक धनलाभाची शक्यता आहे. मोठ्या पैशाचे योग कुठून येतील हे कळणार नाही पण अनेक दिवस मनात ठरवलेल्या गोष्टी होण्याचा दिवस आहे असे वाटेल. पण थोडी सावधगिरी बाळगून काम करणं गरजेचं आहे.

वृश्चिक - जोडीदार काय म्हणतो हे समजून घेणे आज गरजेचे आहे. एकमेकांच्या मताने पुढे जाल कोर्टाची कामे असतील तर त्यामध्ये यश मिळण्याचा दिवस आहे.

धनु - सुखाला समास लागेल. असा काहीसा दिवस आहे. शत्रू वाढतील ठरवलेल्या गोष्टींमध्ये अडचणी येतील. द्विधा मनस्थिती राहणारच आहे. नोकरीमध्ये प्रगतीचा दिवस आहे.

मकर - संततीकडून सुवार्ता कानी येतील. अनेक दिवस कष्ट आणि मेहनतीने मुलीला गोष्टींमध्ये आज यश मिळेल. शेअर्समध्ये प्रगती आहे. न बोलता अनेक गोष्टी घडतील. शिव उपासना करावी. भावनेला महत्व द्या. गणेश उपासना फलदायी ठरेल.

कुंभ - आपल्या जवळच्या व्यक्तीकडून कुटुंबीयांच्याकडून चांगले सहकार्य मिळाल्यामुळे कामाला नव्याने हुरुप येईल. गती आणि प्रगतीकडे ओढा असेल. शेती व्यवसायातून फायदा होईल.

मीन - बहिणीची विशेष माया लाभेल. वेगवान घटना घडतील. जवळच्या प्रवासामधून फायदा होईल. शेजारी लोकांपासून सहकार्य मिळेल. दिवस संमिश्र आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण; VIDEO व्हायरल होताच मनसैनिक आक्रमक

Gopichand Padalkar: विधानभवनात हाणामारी करणारा पडळकर समर्थक ऋषिकेश टकलेची वाजतगाजत मिरवणूक|VIDEO

Moong Dal Halwa Recipe: गोड खाण्याची इच्छा झाली तर, झटपट बनवा खमंग मूग डाळ हलवा

Hair Fall: केस गळताहेत? तुम्हीही 'या' चुका करताय का? जाणून घ्या

Air India Plane Fire: दिल्ली एअरपोर्टवर मोठा अपघात; लँडिंगवेळी एअर इंडियाच्या विमानाला आग

SCROLL FOR NEXT