Horoscope in Marathi saam tv
राशिभविष्य

Tuesday Horoscope : प्रेमामध्ये अखंड बुडून जाल, दक्षता बाळगा; 'या' राशींच्या लोकांना करावा लागेल अडचणींचा सामना

Tuesday Horoscope in Marathi : काही राशीचे लोक प्रेमामध्ये अखंड बुडून जाल. तर काहींना अडचणीचा सामना करावा लागणार आहे.

Vishal Gangurde

आजचे पंचांग

मंगळवार,१५ जुलै २०२५,आषाढ कृष्णपक्ष.

तिथी-पंचमी २२|४०

रास-कुंभ २३|५८ नं. मीन

नक्षत्र-शततारका ०६|२६

पूर्वभाद्रपदा २९|४७

योग-सौभाग्य

करण-कौलव

दिनविशेष-चांगला दिवस

मेष - उच्चभ्रू व्यक्तींमध्ये ऊठबस होईल. मानस आज पूर्ण होईल. व्यवसायाशी निगडी ठरवलेल्या गोष्टी आज मार्गी लागतील. दिवस अनेक लाभ घेऊन आलेला आहे.

वृषभ - जुने काही आजार किंवा दुखणे असतील तर आज आपल्याला चांगले डॉक्टर मिळतील. मॉडेलिंग कलाक्षेत्रातील लोकांना दिवस अनेक संधी घेऊन आलेला आहे.

मिथुन- मोठे व्यवहार, आव्हानात्मक कामे आज पार पडतील. दूरचे प्रवास घडतील. विष्णू उपासनेने अडचणीच्या गोष्टींवर सहज मात करू शकाल. दिवस उत्तम आहे.

कर्क - साध्या स्वभावामुळे कुठेतरी अडकण्याची आज शक्यता आहे. मनातील गोष्टी कुठेही शेअर करू नका. व्यवहारांमध्ये दक्षता बाळगा. दिवस संमिश्र आहे.

सिंह - सरकारी कामांमध्ये यश मिळेल. कोर्ट दरबारी यश राहील. एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या आशीर्वादामुळे आणि मदतीमुळे व्यवसायामध्ये मनासारखे बदल करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे.

कन्या - जोडधंदा करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. नव्याने काही सुरू करू शकता. आव्हानेही पेलू शकता. पण अडचणींचा सामना सुध्दा करावा लागेल. हे तितकेच लक्षात घ्या दिवस बरा आहे.

तूळ - देवी उपासनेने मनोकामना पूर्ण होतील. प्रेमामध्ये अखंड बुडून जाल. एक वेगळ्या प्रकारचा उत्साह आज दिवसभरात असेल. मनात ठरवलेल्या गोष्टी पूर्ण होतील.

वृश्चिक - जागेची निगडीत मोठे व्यवहार व घरामध्ये काहीतरी मोठे बदल, खरेदी यामध्ये पैसा खर्च होईल. जनावरे विक्री किंवा शेतीच्या कामांमध्ये विशेष गती आहे. दिवस चांगला आहे.

धनु - सोबतीचा करार असा काहीसा आजचा दिवस आहे. जवळच्या लोकांचा सहकार्य लाभेल. शेजारी विशेष आपल्याला मदत करतील. जवळच्या प्रवासतून फायदा दिसतो आहे.

मकर- धनामध्ये विशेष वृद्धी होण्याचा आजचा दिवस आहे. निशंकपणे एखादी गुंतवणूक करा. जी लांबच्या मुदतीची असेल तर ती करायला हरकत नाही. कुटुंबीयांचे योग्य सहकार्य लाभेल.

कुंभ - आपले व्यक्तिमत्व मुळातच चांगले आहे. आज सकारात्मकतेने त्याच्यामध्ये भर पडेल. नवीन संशोधनात्मक गोष्टी करण्याकडे आजकल राहील. दिवस प्रभावी आहे.

मीन - सुरुवात आणि शेवट या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. यामधील प्रवास थोडासा खडतर आहे. मनोबल जरा कमीच राहील. जवळच्याच लोकांची आपल्या मनातील गोष्टी सांगा. अन्यथा त्याचा गैरअर्थ घेतला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chutney Bhakri Recipe : कांद्याच्या पातीची चमचमीत चटणी अन् गरमा गरम भाकर रेसिपी

Maharashtra Live News Update: संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा पुणे जिल्ह्यात दाखल

Mira Bhayandar: सोन्याहून महाग कचऱ्याचा डबा, एकाची किंमत ७० हजार रुपये; अंजली दमानियांनी मिरा-भाईंदर पालिकेला घेरलं|VIDEO

Jayant Patil: '..त्यांनी महायुतीत यावं, मी मध्यस्थी करायला तयार'; केंद्रीय मंत्र्याची जयंत पाटलांना मोठी ऑफर

Mehak Pari Arrested : रीलमध्ये शिव्यांची लाखोली, अश्लिलतेचा कळस; सोशल मीडिया स्टार महक-परीवर अटकेची कारवाई

SCROLL FOR NEXT