Tripushkar Yog On Dhantrayodashi saam tv
राशिभविष्य

Dhanteras 2024: आज धनत्रयोदशीच्या दिवशी बनला त्रिपुष्कर योग; 'या' राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा; मिळणार अपार धनसंपत्ती

Tripushkar Yog On Dhantrayodashi: आज धनत्रयोदशीच्या दिवशी त्रिपुष्कर योग, इंद्र योग आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग होणार आहे. अशा परिस्थितीत आजचं महत्त्व अधिकच वाढतंय.

Surabhi Jagdish

दिवाळीला सुरुवात झाली असून आज धनत्रयोदशीचा दिवस आहे. यंदाची दिवाळी ही ज्योतिष्य शास्त्रानुसार, देखील खूप महत्त्वाची मानली जातेय. आज कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. आजच्या दिवसापासून दिव्यांचा उत्सव सुरू होतो. आज धनत्रयोदशीच्या दिवशी त्रिपुष्कर योग, इंद्र योग आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग होणार आहे. अशा परिस्थितीत आजचं महत्त्व अधिकच वाढतंय.

ज्योतिष शास्त्रानुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी आज तयार होत असलेल्या शुभ योगाचा लाभ सर्व राशींना मिळणार आहे. परंतु अशा काही राशी आहेत ज्यांना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. धनत्रयोदशीला तयार होणारे हे शुभ योग काही राशींसाठी लाभदायक ठरणार आहेत. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा म्हणजेच धनत्रयोदशीचा दिवस खूप शुभ असणार आहे. मेष राशीचे लोक त्यांचं ध्येय वेळेवर पूर्ण करू शकणार आहेत. धनत्रयोदशीमुळे व्यापारी आणि व्यापाऱ्यांना चांगला नफा होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी धनत्रयोदशीचा दिवस आनंदाचा असणार आहे. कन्या राशीच्या लोकांसाठी धनत्रयोदशीच्या दिवशी गुंतवणूक करणं फार शुभ राहणार आहे. गाडी खरेदीची इच्छा पूर्ण होणार आहे. जे बेरोजगार आहेत त्यांना नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. तुमच्या घरात वाद असतील तर ते सोडवण्यात तुम्हाला यश मिळणार आहे.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठी धनत्रयोदशीचा दिवस खूप शुभ असणार आहे. तूळ राशीच्या लोकांसाठी देवी लक्ष्मीच्या कृपेने आर्थिक स्थितीत चांगली वाढ होणार आहे. धनत्रयोदशीच्या निमित्ताने तुम्हाला अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमची प्रगती होण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : अजित पवारांनी आर. आर. पाटील यांच्यावर केलेल्या विधानावर फडणवीसांचं मोठं वक्तव्य

Devendra Fadnavis: अमित ठाकरेंना महायुतीतील भाजपचा पाठिंबा मग शिवसेनेने का दिला उमेदवार? फडणवीसांनी सांगितली राजकीय खेळी

नेपाळचा राष्ट्रीय प्राणी कोणता? नाव ऐकून तुम्हालाही होईल आनंद

Diwali Festival: दिवाळीचा फराळ महिनाभर फ्रेश ठेवण्यासाठी 'या' खास टिप्स फॅालो करा

Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये आढळले बॉम्बसदृश्य वस्तूंचे अवशेष; पाईप लाईन दुरुस्तीचे काम सुरु असताना सापडले

SCROLL FOR NEXT