राशिभविष्य

Dhanteras 2024: धनत्रयोदशीला शतकानंतर तयार होणार त्रिग्रही योग; 'या' राशींची होणार दिवाळी, पैसाही हाती येणार

Dhanteras 2024: ज्योतिष्य शास्त्राच्या हिशोबाने देखील हा दिवस फार महत्त्वाचा मानला जातोय. या वर्षी 100 वर्षांनंतर धनत्रयोदशीला त्रिग्रही योग तयार होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

येत्या आठवड्यात दिवाळीला सुरुवात होणार आहे. वसुबारसेनंतर धनत्रयोदशीचा दिवस येतो. या दिवशी भगवान धन्वंतरीसह लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांची पूजा करण्यात येते. दरम्यान ज्योतिष्य शास्त्राच्या हिशोबाने देखील हा दिवस फार महत्त्वाचा मानला जातोय. याचं कारण म्हणजे खास योग जुळून येत आहेत.

या वर्षी 100 वर्षांनंतर धनत्रयोदशीला त्रिग्रही योग म्हणजे त्रिपुष्कर योग, इंद्र योग, वैधृती योग आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्र यांचा उत्तम संयोग तयार होणार आहे. या योगांचा प्रभाव काही राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे. या त्रिग्रही योगांमुळे काही राशींचं आयुष्य सुखकर होणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

कर्क रास

या दिवशी तयार झालेला योग कर्क राशीसाठी अतिशय शुभ मानला जाणार आहे. या काळात तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतात. कुटुंबाच्या सहकार्याने व्यवसायात प्रगती होणार आहे. तुम्हाला वरिष्ठांचे सहकार्य मिळेल, ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होणार आहे.

तूळ रास

तूळ राशीचे लोक व्यवसायात मोठे सौदे करू शकणार आहेत. यावेळी जमीन आणि मालमत्तेशी संबंधित प्रकरणं सोडवता येणार आहेत. तुमचं ध्येय साध्य करण्यातही तुम्ही यशस्वी होणार आहात. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल.

धनु रास

धनु राशीच्या लोकांसाठी उत्पन्नात भरीव वाढीचा काळ असणार आहे. यावेळी बेरोजगारांना नोकरीच्या संधी मिळू शकतात. पदोन्नतीसह पगार वाढू शकतो. नफा मिळवण्यासाठी नवीन कल्पनांवर काम करा.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Worli Dome : मोर्चाच्या चर्चेने सरकारला माघार घ्यावी लागली: Raj Thackeray | VIDEO

अनाजीपंत, अंतरपाट ते बाळासाहेब...; ठाकरे बंधू फडणवीसांवर तुटून पडले

Laptop Full Form: ९९% लोकांना माहित नसेल लॅपटॉपचे फुल फॉर्म काय?

Astro Tips: पुस्तकात मोरपंख नव्हे, 'ही' गोष्ट ठेवा आणि जीवनात जाणवा सकारात्मक बदल

Raj Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत

SCROLL FOR NEXT