Trigrahi Yog 2025: saam tv
राशिभविष्य

Trigrahi Yog: 100 वर्षांनंतर बुधाच्या राशीत बनणार त्रिग्रही राजयोग; 'या' राशींच्या घरी येणार पैसा

Trigrahi Yog In Mithun 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, मिथुन राशीत त्रिग्रही योग तयार होणार आहेय ज्यामुळे ३ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ मिळणार आहे. त्याचप्रमाणे घरात आनंदही येणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह एका विशिष्ट काळात गोचर करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे अनेकदा युती देखील निर्माण होते. याचा परिणाम सर्व राशींवर दिसून येतो. मात्र ग्रहांची ही युती काही लोकांसाठी नकारात्मक आहे तर काहींसाठी सकारात्मक ठरू शकते.

असंच सध्या ग्रहांच्या गोचरमुळे मिथुन राशीत त्रिग्रही योग तयार झालाय. हा योग गुरु, सूर्य आणि बुध यांच्या युतीने तयार होणार आहे. त्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी अशा ३ राशी आहेत ज्यांचे नशीब यावेळी चमकू शकणार आहे. इतर राशींच्या लोकांसाठी अचानक आर्थिक लाभ होणार असून पैसेही मिळणार आहेत. जाणून घेऊया यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे.

मिथुन रास

त्रिग्रही योगाची निर्मिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. हा योग तुमच्या राशीच्या लग्नाच्या स्थितीत तयार होत आहे. यावेळी तुम्हाला तुमच्या करिअरच्या बाबतीत उत्तम संधी मिळू शकतात. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. तुमच्या जोडीदाराची प्रगती होऊ शकते.

धनु रास

धनु राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योगाची निर्मिती सकारात्मक ठरू शकणार आहे. तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. संवादामुळे लोक प्रभावित होऊ शकतात. या काळात, तुम्ही तुमचे विचार अतिशय प्रभावी आणि स्पष्ट पद्धतीने व्यक्त करू शकणार आहात. ज्यामुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंध मजबूत होणार आहेत.

कन्या रास

त्रिग्रही योगाच्या निर्मितीमुळे कन्या राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या कामात प्रगती मिळू शकते. कामाच्या ठिकाणी आणि कुटुंबाशी समन्वय साधून काम करण्याचा फायदा तुम्हाला मिळणार आहे. बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजापुरात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT