Kendra Trikon Rajyog saam tv
राशिभविष्य

Kendra Trikon Rajyog: शुक्राच्या तूळ राशीत प्रवेशाने बनला केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींवर होऊ शकतो पैशांचा पाऊस

Surabhi Kocharekar

ज्योतिष्य शास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाला एक विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. यामध्ये दैत्यांचा गुरु शुक्र याच्या राशी बदलाचा सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम होत असतो. अशा स्थितीत शुक्र ग्रहाने आपली राशी बदलताच प्रत्येक व्यक्तीवर अनेक प्रकारचे परिणाम दिसून येतात.

ज्योतिष शास्त्रानुसार, 18 सप्टेंबर रोजी शुक्र तूळ राशीत प्रवेश केला आहे. शुक्राचा तूळ राशीत प्रवेश होताच शुभ राजयोग तयार झाला आहे. शुक्र स्वतःच्या राशीत आल्याने मालव्य, पराक्रम योग आणि केंद्र त्रिकोण राजयोग तयार झाला आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकणार आहे. जाणून घेऊया या काळात कोणत्या राशींच्या व्यक्तींना सुखाचे दिवस येणार आहेत.

तूळ रास

शुक्र या राशीच्या चढत्या घरात असून यावेळी केंद्र त्रिकोण राजयोग तयार झाल्यामुळे या राशीच्या लोकांना आर्थिक लाभासोबतच प्रत्येक क्षेत्रात यश मिळणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. तुम्ही तुमच्या कामातून आणि वागण्याने लोकांवर प्रभाव पाडाल. तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या काळात तुम्हाला फायदा होणार आहे.

मेष रास

शुक्रामुळे केंद्र त्रिकोण राजयोग तयार झाल्याने प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होणार आहेत. यावेळी कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. या शुभ योगाच्या प्रभावाने तुमचे शौर्य वाढणार आहे. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळू शकणार आहे. व्यावसायिकांसाठीही हा काळ खूप फायदेशीर ठरू शकणार आहे.

मकर रास

केंद्र त्रिकोण राजयोगाच्या निर्मितीने तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवून चांगले पैसे कमवू शकता. व्यवसाय करणाऱ्यांनाही खूप फायदा होणार आहे. संपत्ती मिळवण्याच्या तुमच्या इच्छा पूर्ण होतील. या राशीच्या लोकांसाठी पदोन्नतीची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi USA: भारत अमेरिकेकडून खरेदी करणार हंटर किलर ड्रोन, PM मोदी- जो बाजडेन भेटीत ७ मोठे करार; वाचा सविस्तर

Accident: बीडमध्ये भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू; स्विफ्ट आणि कंटेनरची जोरदार धडक

मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदे आणि सरन्यायाधीश चंद्रचूड एकाच मंचावर येणार; मुंबईत 23 सप्टेंबरला काय घडणार?

Anita Hassanandani: प्रेग्नेंसीनंतर अख्खं वैवाहिक जीवन बदलून जातं; अभिनेत्रीचा खुलासा, चाहत्यांना दिला मोलाचा सल्ला

Viral Video: छेडछाड करणाऱ्या तरुणाला महिलेनं शिकवला धडा, भरचौकात धू धू धुतले; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक

SCROLL FOR NEXT