Shukra Shani Yuti saam tv
राशिभविष्य

Shukra-shani Yuti: राहूच्या गोचरमुळे होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींचा सुरु होणार गोल्डन टाईम

Conjunction Of Saturn And Venus 2025: वैदिक ज्योतिष्य शास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाला एक विशेष महत्त्व असतं. यामध्ये शुक्र आणि शनीला देखील विशेष महत्त्व आहे. या दोन्ही ग्रहांची युती कोणत्या राशींसाठी लाभदायक आहे ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाला एक विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. यापैकी नऊ ग्रहांमध्ये मैत्री आणि शत्रुत्वाची भावना दिसून येते. ग्रहांच्या गोचर दरम्यान शत्रू आणि मित्र ग्रहांची युती होते. ज्याचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होत असतो.

मीन राशीत शनी, शुक्र आणि राहूचा त्रिग्रही योग तयार होत होता. तर १८ मे रोजी राहू ग्रहाने कुंभ राशीत प्रवेश केला. ज्यामुळे मीन राशीत शुक्र आणि शनीची युती झालीये. ज्यामुळे काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होण्याची शक्यता आहे. यावेळी काही राशींना करियरमध्येही चांगली संधी मिळणार आहे.

मीन रास

शुक्र आणि शनीची युती या राशींच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. ही युती तुमच्या राशीच्या लग्नाच्या स्थितीत तयार होणार आहे. या वेळी तुम्हाला मान आणि प्रतिष्ठा मिळू शकते. जर तुम्ही व्यवसायात असाल तर या काळात नवीन भागीदारी फायदेशीर ठरणार आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे.

वृषभ रास

शुक्र आणि शनि यांचं संयोजन तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे. हा योगायोग तुमच्या राशीपासून ११ व्या स्थानावर तयार होणार आहे. काम आणि व्यवसायातही प्रगती होणार आहे. नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्या दृष्टिकोनातूनही ही युती शुभ ठरणार आहे. उत्पन्नाच्या नवीन स्रोतांमधून तुम्ही पैसे कमवू शकता.

मिथुन रास

तुमच्या राशीच्या कर्मभावावर शुक्र आणि शनीची युती होणार आहे. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी वरिष्ठ सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळू शकणार आहे. तुमच्या कामाचं कौतुक होणार आहे. पदोन्नती किंवा नवीन संधी मिळू शकणार आहेत. व्यावसायिकांना चांगले आर्थिक लाभ मिळू शकतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप! एकाच झटक्यात २ कोटीहून अधिक मतदार यादीतून बाहेर; ३६ जिल्ह्यातील आकडेवारी पाहा

Maharashtra News Live Update: पंढरपूर कॉरीडोर बाधित लोकांसाठी विशेष पुनर्वसन धोरण मंजूर

Ladki Bahin Yojana : ऑगस्ट महिन्याचे १५०० रुपये खात्यावर कधी जमा होणार? तारीख आली समोर

Weather Update: मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट! या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार, हवामान विभागाचा अलर्ट

CNG Price Today : CNG च्या दरात मोठी वाढ, मुंबईकरांच्या खिशाला पुन्हा झळ; आजचे ताजे दर काय? वाचा

SCROLL FOR NEXT