Mangal Gochar saam tv
राशिभविष्य

Mangal Gochar: मंगळ ग्रहाचं गोचर वाढणार अडचणी; 'या' राशींच्या आयुष्यात होणार मोठी उलथापालथ!

Mangal Gochar: मंगळ मिथुन रास सोडून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. 21 जानेवारी 2025 पर्यंत मंगळ या राशीत राहणार आहे. यावेळी काही राशींच्या आयुष्यात अडचणी वाढणार आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाला एक विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. यामध्ये मंगळ ग्रहाला विशेष महत्त्व असून या ग्रहाच्या गोचरचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येतो. मंगळ उद्या म्हणजेच 20 ऑक्टोबर 2024 पासून रास बदलणार आहेत. मंगळ मिथुन रास सोडून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. 21 जानेवारी 2025 पर्यंत मंगळ या राशीत राहणार आहे.

कर्क राशीतील मंगळाच्या गोचरचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होणार आहे. मंगळाच्या गोचरमुळे काही राशींच्या जीवनात मोठी उलथापालथ होऊ शक्यता आहे. यामुळे काहींची धनहानी होणार आहे तर काही राशींच्या आयुष्यात अडचणी वाढणार आहेत. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

धनू रास

धनु राशीच्या लोकांमध्ये चिंता आणि नैराश्य वाढण्याचा धोका आहे. या काळात ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. एखाद्या वादामुळे व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. अपघातात दुखापत होण्याचा किंवा आजारी पडण्याचा धोका असतो. प्रेमसंबंधांमध्येही तणाव वाढणार आहे.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांना या काळात फारसा लाभ होणार नाही. यावेळी तुमचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या करिअरवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी मतभेद वाढण्याचा धोका आहे. कुटुंबामधील वाद वाढतील.

मेष रास

मेष राशीच्या लोकांना या काळात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. यावेळी तुमच्या उत्पन्नात अचानक घट होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तणाव आणि भांडणं वाढू शकतात. व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. करियरमधील चांगली संधी तुमच्या हातून निसटू शकते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पेशवे जयंतीनिमित्त रॅली मध्ये सहभाग घेत खासदार मेधा कुलकर्णी यांनी चालवली दुचाकी

Priya Bapat: प्रिया बापटचा स्पेशल बॉसी लूक; लवकरच झळकणार नव्या भूमिका

Asia Cup 2025 : आशिया कपसाठी पाकिस्तानी संघाची घोषणा, PCB चा बाबर आझम-मोहम्मद रिझवानला धक्का

Viral Video: दुकानासमोर उभा असता तो आला अन्...; भारतीय तरुणाला अमेरिकेत मारहाण, VIDEO व्हायरल

Cloudburst: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, ७ नागरिकांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

SCROLL FOR NEXT