Horoscope Today 30th May 2024 Saam TV
राशिभविष्य

Todays Horoscope: 'या' तीन राशीच्या लोकांना आज प्रवासाचा योग; नवीन व्यवहारात यश मिळणार, तुमच्या राशीत काय?

Rashi Bhavishya 30 May 2024 : ग्रहमानाच्या स्थितीवरून प्रत्येक राशीचे भविष्य ठरते. आज ३० मे रोजी कोणत्या राशीत काय आहे, ते आपण सविस्तर जाणून घेऊ या.

Anjali Potdar

आजचे पंचांग

वार- गुरुवार. तिथी-कृष्ण सप्तमी. नक्षत्र-धनिष्ठा. योग-वैधृती. करण-बव. रास-कुंभ. दिनविशेष- वैधृती वर्ज्य.

मेष -आजचा दिवस लाभाचा.

आपली प्रगती करणे हे केव्हाही चांगलंच पण अती लोभ बरा नाही. काही वेळेला याचे त्रास अंगलट येऊ शकतात. नेहमीच हे लक्षात ठेवा. पण आजचा दिवस लाभाचा आहे. लाभाचा पण लोभ नसावा.

वृषभ -केलेल्या कामांमध्ये यश.

कामासाठी फिरती, भ्रमंतीचा आजचा दिवस आहे. पण पैशाची आवकही चांगली राहील. केलेल्या कामांमध्ये यश मिळेल.

मिथुन- भाग्योदयाचा दिवस.

"केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे" हे लक्षात ठेवा. देवाने अनेक गोष्टी दिल्या तरी पण काम आणि कष्ट हे आज नेटाने कराल. मग भाग्योदयाचा दिवस आहे असे जाणवेल.

कर्क- आजचा कठीण दिवस.

अपेक्षा वाढल्या की त्रास सुरू होतो. म्हणूनच खूप गोष्टी आयुष्याकडून आज मागण्याचा दिवस नाहीच खरा. जे आहे तेच पदरात पाडून घ्या सुख मिळवा.

सिंह- जोडीदारांशी मैत्रीपूर्ण संबंध.

जोडीदारांशी मैत्रीपूर्ण संबंध राहतील. संसाराची अर्धवट राहिलेल्या स्वप्नांमध्ये पूर्तता येण्यासाठी दोघेही प्रयत्न कराल. दिवस चांगला आहे.

कन्या- गोष्टी अंगलट येतील.

काही वेळेला आपण केलेले उपकार इतर विसरून जातात. आज तसाच दिवस आहे विनाकारण कोणाचे भले करायला जाऊ नका. गोष्टी अंगलट येतील.

तूळ- संतती हीच संपत्ती.

उपासनेमध्ये समाधान शोधाल देवाला शरण जाल, तर आजचा दिवस चांगला राहील. संतती हीच संपत्ती ही जाणीव होईल.

वृश्चिक- मानसिक अस्वस्थता जाणवेल.

समाधान मिळेल अशा गोष्टी आयुष्यामध्ये खूप कमी असतात. हे मृगजळ आहे. त्यामुळे किती मागे लागायचे हे आज ठरवा. विनाकारण मनाच्या उभाऱ्या मानसिक अस्वस्थता देऊन जातील.

धनु-प्रवास घडतील.

भावंडांचे विशेष सहकार्य राहील. पत्रव्यवहार सुरळीत होतील. आजचा दिवस त्यासाठी चांगला. छोटे प्रवास घडतील.

मकर- पैसा मुबलक राहील.

रुचीला आज विशेष महत्त्व द्याल. चांगल्या गोष्टी खाव्या अशा वाटतील. आणि त्यासाठी वेळ काढाल. कुटुंबीयांच्या मध्ये मन रमवा. पैसा मुबलक राहील.

कुंभ- मनाची स्वस्थता लाभेल.

"मन चंगा तो सब चंगा" आज मनाला वेगळी उभारी राहील. त्यामुळे आजूबाजूला कसेही जग असले तरी छानच वाटेल. मनाची स्वस्थता लाभेल.

मीन - श्रेय मिळणार नाही.

"असुनी नाथ अनाथ" असा आजचा दिवस राहील. करूनही आपल्याला श्रेय मिळत नाही ही खंत राहील. पण आहे ते स्वीकारा आणि पुढे चला.

ज्योतिषशास्त्री अंजली पोतदार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Subsidy : १ ऑक्टोबरपासून LPG ग्राहकांसाठी नवा नियम; सबसिडी हवी असेल तर आजच करा हे काम

Water for kidney health: किडनी खराब होऊ नये म्हणून दिवसातून किती पाणी प्यायलं पाहिजे?

Maharashtra News Live Update: पावसाअभावी पिक करपलं, जालन्यात हताश शेतकऱ्याने सोयाबीनच्या शेतात सोडल्या मेंढ्या

Pune : गणपती विसर्जनात DJ वाजवला, पुण्यातील १० मंडळांवर पोलिसांची मोठी कारवाई

Curry Leaves Benefits: कढीपत्ता फक्त फोडणीसाठी नाही! आरोग्यासाठी आहेत हे 7 जबरदस्त फायदे

SCROLL FOR NEXT