दैनिक पंचांग - दिनांक २ जून २०२४
वार - रविवार. वैशाख कृष्णपक्ष. तिथी - एकादशी. योग - आयुष्यमान. करण - बव. रास - मेष. अपरा (स्मार्त) एकादशी. दिनविशेष - चांगला दिवस.
मेष : मनासारख्या घटना घडतील
खरे तर तापट असणारी आपली रास, पण आज डोकं शांत राहील. मनासारख्या घटना घडल्यामुळे आनंदाचा दिवस राहील. "फुलले रे क्षण माझे फुलले रे" असा आजचा दिवस आहे.
वृषभ : महत्वाची कामे रडखडतील
"कुठे कुठे शोधू तुला" अशी वस्तूंच्या बाबतीत तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. महत्त्वाची कामे उगाचच रखडतील. मन चिंता वाढतील.
मिथुन : नवीन मार्ग सापडतील
आपली रास कायमच बोलकी आहे. लोकांच्या मध्ये राहायला आवडते. त्यामुळे आज नवीन ओळखी होतील. नवीन दिशा नावे मार्ग मिळतील. लाभाच्या गोष्टी पदरात पडणार आहेत हे लक्षात ठेवा.
कर्क : अंदाज अचूक ठरतील
सामाजिक क्षेत्रामध्ये काम करावेसे वाटेल. जीवघेणी स्पर्धा असून सुद्धा तुम्ही हिरीरीने भाग घ्याल. तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरणार आहेत. म्हणून आत्मविश्वासाने पुढे चला.
सिंह : दुपटीने फळ मिळेल
देवधर्माकडे कल राहील. तुमची रास स्वभावत: दानशूर आहे. त्यामुळे दानधर्म करा, निश्चितच दुपटीने फळ मिळेल. लोकांना आश्वस्त कराल.
कन्या : कामाची गती कमी होईल
"कासवाचे घर पाठीवर" असा आजचा दिवस आहे. त्यामुळे कामाचे ओझे घेऊनच पुढे जावे लागेल. कामाची गती पण कमी होईल. शारीरिक स्वास्थ्य जपा.
तूळ : व्यवसायात भरारी घ्याल
जिद्द आणि चिकाटी या गोष्टींच्या जोरावर व्यवसायामध्ये भरारी घ्याल. घरात आणि कामाच्या ठिकाणी सर्वांचे सहकार्य मिळेल. त्यामुळे मानसिकता चांगली राहील.
वृश्चिक : मोठे धाडस करू नका
आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. विनाकारण मोठे धाडस करू नका. तरी पण हित शत्रूंवर मात कराल. चोरी व चोरट्यांपासून सावधान.
धनु : कामात मोठं यश मिळेल
वैचारिक परिवर्तनाचा आज दिवस आहे. इतरांचे साथ घेऊन पुढे जाल. कामे कराल त्यामध्ये यश पण मिळणार आहे. पुढील कामाची ही पक्की वीट असेल.
मकर : कामानिमित्त प्रवास घडेल
राहत्या जागेचे प्रश्न निर्माण होतील. काहींना कामानिमित्त प्रवास घडू शकतो. घरच्यांना सांभाळा, दारच्यांना दारचाच रस्ता दाखवा.
कुंभ : विचारपूर्वक निर्णय घ्या
भावंडांचे सहकार्य लाभेल. शेजारी सहाय्य करतील. विशेष दिवस शासकीय कामासाठी आजचा आहे. पण विचारपूर्वक निर्णय घेऊन आज करायचे का थोडे दिवसांनी हे ठरवा. पत्र व्यवहारातले घोटाळे टाळा.
मीन : पैशांची बचत करा
विनाकारण आर्थिक धाडस नको. पैसा सांभाळा "लक्ष्मी येई घरा" असा आजचा दिवस आहे. हाच पैशाचा विनियोग दानधर्मासाठी करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.