Today's lucky zodiac signs saam tv
राशिभविष्य

Lucky zodiac sign: आज कन्या राशीवर चंद्राची विशेष कृपा! पैशाचे योग, नवी संधी आणि शुभ वेळ; वाचा संपूर्ण पंचांग

Auspicious time and new opportunities today: मन आणि भावनिकतेचा कारक असलेला चंद्र ग्रह हा बुद्धीच्या कारक असलेल्या कन्या राशीत स्थित आहे. चंद्राच्या कन्या राशीतील या शुभ स्थितीमुळे अनेक राशींसाठी धनयोग जुळून येत आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आज 17 नोव्हेंबर 2025 चा दिवस आहे. वैदिक पंचांगानुसार अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आज हेमंत ऋतूची चाहूल अधिक स्पष्ट जाणवते. चंद्र कन्या राशीत भ्रमण करत असल्याने मेहनत, शिस्त आणि नियोजनाला सकारात्मक फळ मिळण्याची शक्यता आहे.

शुभ कार्यांसाठी अभिजीत मुहूर्त उपयुक्त असून काही राशींना विशेष लाभ मिळणार आहेत. खाली दिलेल्या माहितीच्या आधारे आजचं सविस्तर पंचांग पाहूया.

आजचं पंचांग तपशील

  • तिथि: कृष्ण त्रयोदशी

  • नक्षत्र: चित्रा

  • करण: गर

  • पक्ष: कृष्ण पक्ष

  • योग: आयुष्मान (१८ नोव्हेंबर, सकाळी ०८:०९:५७ पर्यंत)

  • वार: सोमवार

  • सूर्योदय: 06:37:13 AM

  • सूर्यास्त: 05:26:59 PM

  • चंद्र उदय: 03:55:50 AM

  • चंद्रास्त: 03:30:16 PM

  • चंद्र राशी: कन्या

  • ऋतु: हेमंत

  • शक संवत्: 1947

  • विक्रम संवत्: 2082

  • माह (अमान्ता): कार्तिक

  • माह (पुर्निमान्ता): मृगशिरा

अशुभ काल

  • राहुकाल: 07:58:26 AM ते 09:19:39 AM

  • यमघंट काल: 10:40:53 AM ते 12:02:06 PM

  • गुलिकाल: 01:23:19 PM ते 02:44:33 PM

शुभ मुहूर्त

  • अभिजीत मुहूर्त: 11:41:00 AM ते 12:23:00 PM

या राशींसाठी लकी ठरणार आजचा दिवस

कन्या राशी

चंद्र आपल्या राशीत असल्याने आजचा दिवस फायदेशीर ठरणार आहे. नियोजनबद्ध कामाला अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळणार आहे. आज तुमची अडकलेली कामे पुढे सरकणार आहे. आरोग्य ठीक राहील आणि मानसिक स्थिरता जाणवणार आहे.

वृषभ राशी

आर्थिक दृष्ट्या आजचा दिवस चांगला आहे. उत्पन्नवाढ, नवी संधी आणि व्यावसायिक प्रगतीची शक्यता आहे. वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. घेतलेल्या निर्णयांचे चांगले परिणाम दिसतील.

मकर राशी

कामात स्थैर्य आणि प्रगती दिसेल. प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता जास्त. जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होईल पण ती तुम्ही सहजपणे पेलाल. आर्थिक लाभ आणि शुभ बातमीचा योग आहे.

कर्क राशी

आज भावनिक स्थैर्य वाढणार आहे. कुटुंबात समाधानाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे. कामातील ताण कमी होणार आहे. नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. दुपारनंतर महत्त्वाची माहिती किंवा शुभ वार्ता मिळू शकते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना १२३ ठिकाणी लढवणार निवडणूक

Eyebrow Growth Tips: रातोरात वाढतील आयब्रो, फक्त २० रुपयांत होईल काम

Tharala Tar Mag Video : नवऱ्याचं अफेअर अस्मिताला कळलं; अर्जुनने थेट कानशिलात लगावली, मालिकेत येणार 'हे' धक्कादायक वळण

Sports legends retiring: मेस्सी, धोनी आणि...! 2026 मध्ये हे खेळाडू होणार निवृत्त

BMC Election: मुंबईत शिंदेसेनेला मोठं खिंडार, बड्या नेत्यासह २०० पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

SCROLL FOR NEXT