Horoscope Saam Tv
राशिभविष्य

Zodiac signs: चतुर्थीच्या योगात आज चार राशींच्या नशिबाचा तारा चमकणार! पाहा तुमची रास आहे का?

Horoscope fortune: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक आठवड्यात ग्रहांची (Planetary Transits) स्थिती बदलत असते, ज्याचा थेट परिणाम १२ राशींवर होत असतो.

Surabhi Jayashree Jagdish

आज ११ ऑक्टोबर असून शनिवारचा दिवस आहे. आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे. त्यामुळे आजचा दिवस हा धार्मिकदृष्ट्या हा दिवस महत्त्वाचा मानला जातोय. चतुर्थीला गणपतीची पूजा केल्यास विघ्नांचा नाश होतो असं मानण्यात येतं. आज ग्रहांची स्थिती थोडी गंभीर असली तरी योग्य नियोजन आणि संयमाने काम केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात.

कशी आहे आज ग्रहांची स्थिती

चंद्र धनू राशीत भ्रमण करत असल्याने मानसिक स्थैर्य, धैर्य आणि आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे. काही राशींवर शुभ संयोग बनणार आहेत. ज्यामुळे नवे मार्ग खुले होणार आहेत. आर्थिक स्थिती सुधारेल आणि कौटुंबिक जीवनात समाधान लाभणा आहे. आजचा दिवस जुन्या गोष्टींचा आढावा घेऊन सुधारणा करण्यासही योग्य आहे.

ज्योतिष्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, नवीन करार, नवीन नोकरी किंवा व्यावसायिक निर्णय घेताना सावधगिरी बाळगणं तुमच्या फायद्याचं असणार आहे. योग्य मुहूर्तात केलेल्या कृती लाभदायक ठरतील. आजच्या दिवशी कोणत्या चार राशींना लाभ होणार आहे ते पाहूयात.

पंचांग माहिती

  • तारीख: ११ ऑक्टोबर २०२५

  • तिथी: आश्विन कृष्ण चतुर्थी

  • वार: शनिवार

  • नक्षत्र: भरणी

  • योग: शुभ योग

  • चंद्र राशी: धनू

  • सूर्य राशी: कन्या

  • सूर्योदय: सकाळी ६:२७

  • सूर्यास्त: सायंकाळी ५:५९

शुभ मुहूर्त व राहुकाल

  • अभिजित मुहूर्त: दुपारी १२:०३ ते १२:५०

  • गुलिक काल: सकाळी ६:३० ते ८:००

  • राहुकाल: सकाळी ९:०० ते १०:३०

  • अमृत काल: सकाळी १०:१५ ते ११:४५

  • दुर्मुहूर्त: दुपारी १:४५ ते २:३५ आणि रात्री ९:२० ते १०:१०

या चार राशींना लाभ मिळण्याची शक्यता

वृषभ राशी

वृषभ राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या काळात इतरांच्या मदतीने तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतात. कुटुंबातील सदस्य तुम्हाला चांगली साथ देणार आहेत.

कन्या राशी

कन्या राशीसाठी हा दिवस मानसिक शांती घेऊन येणार आहे. आजच्या दिवशी सगळी कामं नियोजनपूर्वक करा. यामुळे तुम्हाला लाभ मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला मदत मिळण्याची शक्यता आहे.

वृश्‍चिक राशी

वृश्‍चिक राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात मान-सन्मान मिळेल. जुन्या संबंधातून नवा फायदा होणार आहे. प्रवास योग संभवतो आणि तो लाभदायक राहणार आहे. आत्मविश्वास वाढण्याची दाट शक्यता आहे.

मीन राशी

मीन राशीसाठी आजचा दिवस अध्यात्म, अंतर्मनाची शक्ती आणि आर्थिक स्थैर्यासाठी अनुकूल आहे. नवीन काम सुरू करणं, गुंतवणूकीतून चांगला फायदा लाभणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : महिलांच्या खात्यात १०,००० जमा करा- उद्धव ठाकरेंची मागणी

Mumbai Picnic Tourism: मुंबईपासून फक्त ५० किमीवर वसलाय सुंदर निसर्ग, मुलांसोबत पिकनिकसाठी बेस्ट स्पॉट

Diwali Dmart Shopping: डिमार्टमध्ये कोणत्या दिवशी स्वस्त सामान असते? ९९ टक्के लोकांना माहित नाही

Crime : पती बनला हैवान, रागाच्या भरात पत्नीला जिवंत जाळलं; माहेरी फोन करुन सांगितलं अन्...

Sameer Wankhede: 'मला पाकिस्तान आणि बांगलादेशकडून धमकीचे मेसेज...' समीर वानखेडेंचा दावा

SCROLL FOR NEXT