Budhaditya Rajyog: 12 महिन्यांनी शुक्राच्या राशीत बनणार पॉवरफुल बुधादित्य राजयोग; 'या' राशींचं नशीब बदलणार
वैदिक ज्योतिषशास्त्रात बुधादित्य राजयोग हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कोणाच्या जन्मकुंडलीत हा राजयोग तयार होतो त्या व्यक्तीच्या आयुष्यात धनाची कमतरता राहत नाही, असा समज आहे. ग्रह ठराविक अंतराने एकत्र येऊन हा विशेष योग तयार करतात.
येत्या काळात म्हणजेच पुढच्या महिन्यात सूर्य आणि बुध यांच्या युतीमुळे बुधादित्य राजयोग घडतो. यंदा ऑक्टोबर महिन्यात तुला राशीत हा योग तयार होत असून त्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसणार आहे. मात्र या काळात तीन भाग्यवान राशींचं नशीब अधिक उजळणार आहे. केवळ संपत्तीच नव्हे तर मान-सन्मान आणि प्रतिष्ठाही मिळणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.
मकर रास
मकर राशीसाठी बुधादित्य राजयोग अत्यंत लाभदायक ठरणार आहे. कारण हा योग तुमच्या करिअर आणि व्यवसायाशी संबंधित स्थानी तयार होणार आहे. ज्यांना नोकरीची शोधाशोध आहे, त्यांना चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना कार्यक्षेत्रात नवी जबाबदारी मिळेल आणि करिअरमध्ये प्रगती होणार आहे. संपत्ती किंवा वाहन खरेदीची योजना आखू शकणार आहात.
तूळ रास
तूळ राशीसाठी हा योग अत्यंत शुभ आहे. बुधादित्य राजयोग तुमच्या गोचर कुंडलीत प्रथम स्थानी तयार होणार आहे. तुमची काम करण्याची पद्धत अधिक होणार आहे. या काळात आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होणार आहे. त्याचप्रमाणे कर्जातूनही मुक्ती मिळण्याची शक्यता आहे. विवाहित लोकांचा संसार सुखकर होऊ शकतो.
मिथुन रास
मिथुन राशीसाठी बुधादित्य राजयोग पंचम भावात तयार होणार आहे. तुम्हाला मुलांबाबत शुभ वार्ता मिळू शकणार आहे. वैवाहिक जीवनातील तणाव आणि अडचणी दूर होणार आहेत. कुटुंबासोबत आनंददायी आणि संस्मरणीय क्षण घालवण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. धनलाभ होण्याची शक्यताही आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

