Lakshmi Puja Muhurat 2025 saam tv
राशिभविष्य

Lakshmi Puja: आज दिवाळीचा सर्वात महत्त्वाचा दिवस! लक्ष्मीपूजनाची अचूक वेळ आणि ४ राशींसाठी शुभ संकेत

Lakshmi Puja Muhurat 2025: दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण आहे. या पाच दिवसांच्या उत्सवातील मुख्य दिवस म्हणजे लक्ष्मी पूजन (Lakshmi Pujan). या दिवशी धन, समृद्धी आणि ऐश्वर्याची देवी माता लक्ष्मीचे पूजन केले जाते.

Surabhi Jayashree Jagdish

आज २१ ऑक्टोबर २०२५ मंगळवार असून दिवाळीचा मुख्य दिवस लक्ष्मीपूजन साजरा केला जाणार आहे. हा दिवस हिंदू पंचांगानुसार कार्तिक अमावास्येला येतो आणि वर्षातील सर्वात शुभ तिथींपैकी एक मानला जातो. आजच्या दिवशी माता लक्ष्मी, भगवान विष्णू आणि कुबेर यांची पूजा करून सुख-समृद्धी, धनवृद्धी आणि शांतीची प्रार्थना करण्यात येते.

लक्ष्मीपूजनाची वेळ अत्यंत महत्त्वाची असते, कारण या काळात केलेली पुजा आणि साधना मनोकामना पूर्ण करणारी मानली जाते. आजची ग्रहस्थिती आत्मविश्वास, सकारात्मकता आणि स्थैर्य वाढवणारी आहे. काही राशींसाठी आजचा दिवस विशेष लाभदायी ठरणार आहे.

आजचं पंचांग

  • वार: मंगळवार

  • तिथी: कार्तिक अमावस्या

  • नक्षत्र: चित्रा

  • करण: नाग

  • पक्ष: कृष्ण पक्ष

  • योग: विष्कुंभ (३:१७ पर्यंत, २२ ऑक्टोबर)

  • ऋतु: शरद

  • सूर्योदय: सकाळी ६:३४

  • सूर्यास्त: संध्याकाळी ६:११

  • चंद्रोदय: सकाळी ६:१४

  • चंद्रास्त: संध्याकाळी ५:५७

  • चंद्रराशी: कन्या

  • शक संवत्: १९४७

  • विक्रम संवत्: २०८२

  • हिंदू महिना: कार्तिक (पूर्णिमांत), अश्विन (अमान्त)

शुभ व अशुभ मुहूर्त

  • अभिजीत मुहूर्त: दुपारी १२:०० ते १२:४६

  • राहुकाल: दुपारी ४:४५ ते संध्याकाळी ६:१२

  • गुलिकाल: दुपारी ३:१७ ते ४:४५

  • यमघंट: दुपारी १२:२३ ते १:५०

लक्ष्मीपूजनाचं महत्त्व

दिवाळीच्या दिवशी अमावास्येच्या रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर येऊन भक्तांच्या घरी सुख-समृद्धीचा वर्षाव करतात, अशी मान्यता आहे. या रात्री प्रकाशाचा अंधारावर विजय साजरा केला जातो. यावेळी घरातील सर्व दिवे, पणती आणि कंदील लावून नकारात्मकता दूर केली जाते. व्यापारी आणि गृहस्थ या दोघांसाठीही हा दिवस आर्थिकदृष्ट्या शुभ ठरतो.

धर्मग्रथांमध्ये असं नमूद करण्यात आलंय की, लक्ष्मीपूजनाच्या वेळी भगवान गणेश, माता लक्ष्मी आणि कुबेर यांची एकत्र पूजा केली जाते. घरात स्वच्छता, प्रसन्नता आणि प्रेम वातावरण असल्यास लक्ष्मी कृपा नक्की होते.

आज चार राशींसाठी विशेष शुभफल

वृषभ (Taurus)

आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ असणार आहे आहे. आर्थिक क्षेत्रात प्रगती, नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होणार आहे. लक्ष्मीपूजनामुळे धनप्राप्तीचे योग बलवान होणार आहेत. घरात समाधान आणि प्रसन्नता राहणार आहे.

सिंह (Leo)

आज तुमचा आत्मविश्वास उंचावणार आहे. कामातील जबाबदाऱ्या उत्तमरित्या पार पाडू शकणार आहात. घरात दिवाळीच्या या दिवशी उत्सवाचं वातावरण राहणार आहे. दाम्पत्यांना आनंददायी क्षण मिळतील.

तूळ (Libra)

माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहणार आहे. आर्थिकदृष्ट्या चांगली प्रगती होणार आहे. गुंतवणूक, खरेदी किंवा व्यवसायासाठी शुभ काळ मानला जातोय. मानसिक शांती आणि कौटुंबिक एकता अनुभवता येणार आहे.

मीन (Pisces)

नवीन कामांची सुरुवात यशस्वी होणार आहे. धार्मिक कार्यात यावेळी तुमचा रस वाढणार आहे. आजचा दिवस अध्यात्म आणि समाधान देणारा असणार आहे. शुभ लाभ आणि मानसिक स्थैर्य मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात परतीच्या पावसाचा धुमाकूळ

Mumbai Port Authority: सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रकल्प रखडला; ‘मुंबई पोर्ट’कडून परवानगीसाठी विनंती

Ratnagiri Tourism : प्राचीन वास्तुकला अन् रेखी‍व शिल्पे, रत्नागिरीत गेल्यावर 'ही' लेणी पाहायला नक्की जा

Crime News: चहावाल्याच्या घरी सापडलं घबाड; १ कोटींची रक्कम अन् सोने,चांदी; दोन भावांचा कांड पाहून अधिकारीही चक्रावले

Bihar Election : ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याने दिला पक्षाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT