Dhanteras 2025 Saam TV
राशिभविष्य

Dhanteras 2025: आज धनत्रयोदशी आणि शुभ ग्रहयोग! खरेदी, गुंतवणूक आणि भाग्य उघडण्यासाठी सर्वोत्तम दिवस

Dhanteras 2025 auspicious time: शुक्रवार, १७ ऑक्टोबर २०२५ हा केवळ धनत्रयोदशीचा दिवस नाही, तर ग्रहांच्या अत्यंत शुभ संयोगाने तयार झालेल्या महा-राजयोगामुळे ऐतिहासिक दिवस ठरत आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आज १८ ऑक्टोबर २०२५ शनिवार असून धनत्रयोदशीचा दिवस आहे. कार्तिक कृष्ण पक्षाची त्रयोदशी तिथी ही धन, आरोग्य, आयुष्यवृद्धी आणि सुख-समृद्धी यासाठी अत्यंत शुभ मानली जाते. आजच्या दिवशी भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मी यांच्या पूजनाची परंपरा आहे.

शुभ ग्रहस्थितीमुळे आज खरेदी, गुंतवणूक, व्यवसायाची सुरुवात आणि धनलाभासाठी उत्तम समय आहे. आरोग्य सुधारण्यासाठी आणि कर्जमुक्त जीवनासाठी आज केलेले उपाय फलदायी मानले जातात. ग्रहांची मांडणी मानसिक स्थैर्य, कौटुंबिक समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी सहाय्यक आहे.

आजचं पंचांग

  • वार: शनिवार

  • तारीख: १८ ऑक्टोबर २०२५

  • पक्ष: कृष्ण पक्ष

  • तिथी: त्रयोदशी (धनत्रयोदशी)

  • नक्षत्र: धनिष्ठा नक्षत्र

  • योग: शुभ योग

  • करण: तैतिल करण

  • सूर्योदय: सकाळी अंदाजे ६:२४

  • सूर्यास्त: संध्याकाळी अंदाजे ५:५९

  • चंद्रोदय: रात्री अंदाजे ३:१०

  • चंद्रराशी: कुंभ राशीत भ्रमण

आजच्या तिथीचं महत्त्व – धनत्रयोदशी

ही तिथी भगवान धन्वंतरी यांची जयंती मानली जाते. आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते. तसेच माता लक्ष्मीचे आवाहन करून धन-धान्याची समृद्धी मिळवण्यासाठी दीपदान व पूजन केले जाते. आज वस्तू खरेदी केली तर ती दीर्घकाळ टिकते व शुभफल देते.

शुभ मुहूर्त (धनत्रयोदशी विशेष)

  • धनलाभासाठी सर्वोत्तम मुहूर्त: सायंकाळी ६:१८ ते ८:०५ (प्रदोषकाल)

  • लक्ष्मी पूजन: सायंकाळी ६:२५ ते ७:५०

  • दीपदान: सूर्यास्तानंतर ५:५९ ते ७:३०

  • सुवर्ण / वाहन खरेदी: सकाळी १०:३० ते १२:१५ आणि दुपारी २:०० ते ३:३०

  • नवीन कामाची सुरुवात: अभिजित मुहूर्त १२:०० ते १२:४५

  • आरोग्यसंबंधी उपाय / आरोग्य देवतेचे पूजन: सकाळी ८:०० ते ९:३०

आज चार राशींना विशेष शुभफल

वृषभ

धनत्रयोदशीमुळे शुक्र ग्रहाचा विशेष आशीर्वाद राहणार आहे. आर्थिक वृद्धी, बँकेतून चांगली बातमी, घरात आनंदाचे वातावरण येणार आहे. खरेदीत यश मिळू शकणार आहे.

सिंह

नवीन संधी आणि प्रसिद्धी मिळणार आहे. वरिष्ठांकडून समर्थन होणार आहे. आर्थिक लाभाची शक्यता वर्तवण्यात येतेय. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल.

तूळ

आज लक्ष्मीप्रसाद मिळण्याचा योग आहे. गुंतवणुकीत मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. जुने अडथळे दूर होणार आहेत. जोडीदाराचा पाठिंबा मिळणार आहे. मानसिक समाधान मिळू शकणार आहे. घरात पूजा केल्यास विशेष फल मिळू शकतं.

कुंभ

चंद्र कुंभ राशीत असल्याने भाग्य साथ देईल. करिअरमध्ये प्रगती होण्याची चिन्ह दिसून येतायत. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेहबूबा-मेहबूबा गाण्यावर बेली डान्सर थिरकत होती, अचानक आगीच्या ठिणग्या अन् लोकांची धावाधाव; गोव्यातील दुर्घटनेचा VIDEO

Bone cancer: लहान मुलांमधील हाडांच्या कॅन्सरचं निदान का होतं उशीरा? काय आहेत याची लक्षणं वाचा

Maharashtra Live News Update: गोरेगाव आरे कॉलनी परिसरात मोठा अपघात

Bigg Boss 19 Winner : 'बिग बॉस १९'ची ट्रॉफी कोण घरी घेऊन जाणार? 'हा' स्पर्धक आघाडीवर

PM किसान योजनेतून धाराशिवचे २५८८ शेतकरी वगळले, कारण आले समोर

SCROLL FOR NEXT