Horoscope  Saam tv
राशिभविष्य

Thursday Horoscope : अचानक धनलाभ होईल, कुटुंबातील सदस्य खूश होतील; ५ राशींच्या लोकांच्या मनासारख्या घटना घडतील

Thursday Horoscope in Marathi : आज काही राशींच्या लोकांना अचानक धनलाभ होईल. काही राशींच्या लोकांच्या मनासारख्या घटना घडतील.

Anjali Potdar

पंचांग

गुरुवार,१८ डिसेंबर २०२५,मार्गशीर्ष कृष्णपक्ष,शिवरात्री.

तिथी-चतुर्दशी २९|००

रास-वृश्चिक

नक्षत्र-अनुराधा

योग- धृति

करण- विष्टीकरण

दिनविशेष-चतुर्दशी वर्ज्य

मेष - संततीचे प्रश्न मार्गी लागणार आहेत. बौद्धिक क्षेत्रांमध्ये प्रगती होईल. आपल्यामध्ये नव्याने काही ग्रहण करण्याची शक्ती, अर्थात प्रज्ञावृद्धी वाढेल. सृजनशीलता चांगली राहील.

वृषभ - हाती घेतलेल्या कामांमध्ये सुयश लाभणार आहे. दैनंदिन कामे सुद्धा मार्गे लागतील. अवघड गोष्टी सोप्या झाल्यामुळे दिवस चांगला वाटेल.

मिथुन - नोकरी व्यवसायामध्ये समाधानकारक स्थिती राहील. नातेवाईकांच्या सहकार्याने पुढे जाणार आहात. दिवस संमिश्र आहे.

कर्क - जुनी येणी वसूल होतील. व्यावसायिक क्षेत्रात भरभराट होईल. व्यवसायातील भागीदाराचे म्हणणे ऐकून घेतल्यास नवीन कामे मिळण्याची शक्यता आहे. दिवस संमिश्र आहे.

सिंह - रखडलेली कामे मार्गी लागतील. मनोबल आणि आत्मविश्वास वाढवणाऱ्या घटना आज घडणार आहेत. मनातील गोष्टी पूर्ततेकडे जाण्यासाठी विशेष प्रयत्नशील असाल आणि त्या होतीलही.

कन्या - तब्येतीच्या तक्रारी वाढतील. प्रवास शक्यतो टाळावेत टाळावेत. प्रवासामध्ये महत्त्वाचे ऐवज आणि जिन्नस याची विशेष काळजी घ्या. दिवस संमिश्र आहे.

तूळ - मानसिक स्वास्थ आणि समाधान लाभेल. दैनंदिन कामे सुद्धा मार्गी लागतील.मनामध्ये असणाऱ्या गोष्टी सहज घडतील. दिवस सौख्य घेऊन आलेला आहे. काळजी नसावी.

वृश्चिक - निर्णय घेण्यासाठी कधीही तुम्ही निर्णय घेण्यासाठी कधी तुम्ही कचरत नाही. आज मात्र तुम्ही घेतलेले निर्णय आणि अंदाज अचूक राहणार आहेत. तुमच्या असणाऱ्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभतील. प्रसिद्धी लाभेल. दिवस समाधान घेऊन आलेला आहे.

धनू - गुरुकृपेने जीवनाची वाट सुखकर होईल. चांगल्या घटना घडण्याचा आजचा दिवस आहे. मनस्वास्थ्य सुद्धा चांगले राहील. कोणत्याही गोष्टीत गोंधळ न करता निर्णय घ्यावेत.

मकर - महत्त्वाची कामे शक्यतो आज नकोत. कारण रखडण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनामध्ये वादविवाद होतील. "नको असणाऱ्या गोष्टींचा खापर आपल्यावर फुटेल". काळजी घ्यावी.

कुंभ - वैवाहिक जीवनामध्ये सुसंवाद साधाल. आपले मत बुवा विषयी आज तुम्ही आग्रही रहाल. व्यावसायिक भरभराट होण्याचा आजचा दिवस दिसतो आहे.

मीन - हितशत्रूंवर मात कराल. वाहने जपून चालवावीत. असा आजचा सल्ला आहे.आपले कोण आणि परके कोण आहे ओळखून आज वागणे गरजेचे आहे. नाहीतर "पालथ्या घडावर पाणी" असे होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime : समलैंगिक प्रेमाचा धक्कादायक शेवट! घरी जाण्यास नकार दिला, पार्टनरने छातीत चाकू खुपसला अन्...

Crime: कोचकडून हॉकी खेळाडूवर बलात्कार, स्टेडिअमच्या बाथरूमध्ये नेलं अन्...; पीडित मुलगी गरोदर

X युजर्स सावधान! हे नियम पाळा नाहीतर तुमचंही अकाउंट होईल Delete

Maharashtra Live News Update : माजी आमदार शिरीष चौधरींच्या घरावर हल्ला, राजकीय षडयंत्र

Bigg Boss House: बिग बॉस मराठी६ सुरू होण्याआधी घराची पहिली झलक आली समोर; रहस्यांनी भरलेल्या घरात काय आहे नवीन?

SCROLL FOR NEXT