Surya-Rahu Yuti saam tv
राशिभविष्य

Surya-Rahu Yuti: 2 दिवसांनंतर 'या' राशींचं नशीब चमकणार; सूर्य-राहूच्या युतीने धनलाभाची शक्यता

Surya And Rahu Yuti: १४ मार्चला मीन राशीत राहू आणि सूर्य एकत्र येणार आहेत. तब्बल १८ वर्षांनंतर मीन राशीत या दोन ग्रहांची महत्त्वपूर्ण युती होत आहे. याचा प्रभाव काही राशींवर मोठ्या प्रमाणात दिसून येणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह एका ठराविक अंतराने गोचर करतात. यावेळी त्यांचा इतर ग्रहांशी संयोग होत असतो. त्याचा परिणाम देश आणि जगासह मानवी जीवनावर दिसून येतो. येत्या काळात म्हणजेच दोन दिवसांनी अशीच ग्रहांची युती होणार आहे. सूर्य आणि राहूची युती होणार असून यामुळे सर्व राशींच्या जीवनावर परिणाम होणार आहे.

१४ मार्च रोजी मीन राशीत राहू आणि सूर्याची युती होणार आहे. मीन राशीत १८ वर्षांनी या दोन ग्रहांची युती होणार आहे. ज्यामुळे काही राशींचं भाग्य उजळू शकणार आहे. या काळात काही राशींच्या व्यक्तींना पैसा मिळणार आहे तर काही राशींना करियरमध्ये चांगली संधी मिळणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

मकर रास

सूर्य आणि राहूची युती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. यावेळी तुमचं धैर्य आणि शौर्य वाढू शकणार आहे. ज्या लोकांचा व्यवसाय परदेशांशी जोडलेला आहे त्यांना लाभ मिळू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांसाठीही वेळ चांगला राहणार आहे. तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळू शकणार आहे. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची दाट शक्यता आहे.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि राहूची युती सकारात्मक ठरू शकणार आहे. गोचर कुंडलीच्या भाग्य आणि नवव्या घरात युती तयार होणार आहे. या वेळी तुमचं भाग्य वाढू शकणार आहे. नातेवाईकांशी संबंध सुधारणार आहेत. तुम्ही धार्मिक तसंच शुभ कामात सहभागी होऊ शकता. आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहण्याची शक्यता आहे.

मिथुन रास

राहू आणि सूर्याचं संयोजन तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. या वेळी व्यवसायात विशेष प्रगती मिळू शकणार आहे. नोकरदार लोकांसाठीही हा काळ चांगला राहण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना यावेळी पदोन्नती मिळू शकते. बिझनेस करणाऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित आहे. या गोष्टी केवळ माहितीसाठी दिल्या जात आहेत. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: भाजप १०० जागा लढेल तर आम्ही ५० पण...; जागावाटपावर शिवसेना नेत्याचं मोठं वक्तव्य

Pandharpur Accident: भुजबळ वस्तीजवळ कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; दोन्ही वाहनांचा चक्काचूर

Phone: चुकूनही फोन १०० टक्के चार्ज करु नका, अन्यथा...

Maharashtra Live News Update: हातात कोयता घेऊन तरुणाचा दहशत माजवण्याचा प्रयत्न; व्हिडिओ व्हायरल

DRI मुंबईची भव्य कारवाई; २३ कोटींचा ई-कचरा जप्त, मास्टरमाईंड अटक

SCROLL FOR NEXT