Laxmi Narayan Raj Yog saam tv
राशिभविष्य

Laxmi Narayan Raj Yog: 27 फेब्रुवारी रोजी 'या' राशींची होणार चांदी; लक्ष्मी नारायण योग मिळवून देणार पैसाच पैसा

Laxmi Narayan Raj Yog: बुध आणि शुक्र यांच्या युतीमुळे लक्ष्मी नारायण राजयोग तयार होणार आहे. यासोबतच राहू ग्रह देखील मीन राशीत आहे. यावेळी या ग्रहांमुळे आणि राजयोगामुळे काही राशींच्या व्यक्तींना सकारात्मक परिणाम मिळणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाला विशेष महत्त्व आहे. यामध्ये बुध आणि शुक्र यांनाही खास महत्त्व देण्यात आलं आहे. ग्रहांचा राजकुमार बुध हा वाणी, बुद्धी, विवेक, शिक्षण आणि व्यवसायाचा कारक मानला जातो. तर शुक्र ग्रह हा धन, समृद्धी, आनंद, यांचा कारक मानला जातो. या दोन्ही ग्रहांच्या स्थितीतील बदलाचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येणार आहे.

सध्या शुक्र मीन राशीत असून २७ फेब्रुवारी रोजी बुध ग्रह देखील या राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी बुध आणि शुक्र यांच्या युतीमुळे लक्ष्मी नारायण राजयोग तयार होणार आहे. यासोबतच राहू ग्रह देखील मीन राशीत आहे. यावेळी या ग्रहांमुळे आणि राजयोगामुळे काही राशींच्या व्यक्तींना सकारात्मक परिणाम मिळणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

धनु रास

लक्ष्मी नारायण योगामुळे या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतात. तुमच्या आयुष्यात आनंद तुमच्या दारावर ठोठावू शकणार आहे. दीर्घकालीन आजारही बऱ्याच प्रमाणात बरे होऊ शकतात. कोर्टाच्या केसेसमध्ये तुमचा विजय होऊ शकतो.

कन्या रास

लक्ष्मी नारायण राजयोगाच्या निर्मितीमुळे या राशीच्या लोकांमध्ये प्रेम आणि रोमान्स अधिक असणार आहे. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकणार आहेत. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकणार आहात. आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे.

कर्क रास

या राशीच्या नवव्या घरात लक्ष्मी नारायण राजयोग तयार होणार आहे. हे घर भाग्याचं घर मानलं जातं. बुध ग्रहाच्या कृपेने तुमच्या बौद्धिक क्षमतेत सुधारणा होण्याची शक्यता आहे. तुम्ही अनेक क्षेत्रात यश मिळवू शकता. तुमचा अध्यात्माकडे कल वाढू शकतो. घर खरेदी करण्यात किंवा घराचं नूतनीकरण करण्यात यशस्वी होऊ शकता.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिहारमध्ये मोठी दुर्घटना! गंगा नदीत २० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू

महायुतीत समन्वयाचा 'दुष्काळ', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा नाराज?

Fact Check: ऑनलाईन शॉपिंग महागणार? ऑनलाईन शॉपिंगवर 5% GST?

नवी मुंबई महापालिकेत मतदार राहतात, वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर 27 मतदारांची नोंद

IMD Alert: महाराष्ट्रासह 17 राज्यात धो-धो बरसणार वरूणराजा; 60 ताशी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

SCROLL FOR NEXT