Weekly Horoscope Saam Tv
राशिभविष्य

Weekly Horoscope: या राशींना कुटुंबासाठी अनपेक्षित खर्च करावे लागतील, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

ज्योतिषशास्त्रानुसार या आठवड्यात काही राशींना कुटुंबासाठी अनपेक्षित खर्च करावा लागू शकतो. ग्रहस्थितीमुळे आर्थिक नियोजनात बदल होईल आणि घरगुती जबाबदाऱ्या वाढतील.

Surabhi Jayashree Jagdish

मेष

प्रवासात मनस्ताप संभवतो. मोठे खर्च करावे लागतील. परदेश प्रवास लांबणीवर पडेल. कर्जाच्या कामात अडथळे येतील. उत्तरार्धात आरोग्यात चांगली सुधारणा होईल.

वृषभ

इच्छापूर्ती विलंबाने होईल. उत्तरार्धात मोठे प्रवास, सहली होतील, कर्ज मंजूर होतील. स्वभावात मोठे बदल जाणवतील. मोठे बदल करण्याकडे कल वाढेल.

मिथुन

नोकरी-व्यवसायात दगदग वाढेल. नोकरीत वरिष्ठांकडून होणारी मनमानी सहन करावी लागेल. उत्तरार्धात मात्र काही मनासारख्या घटना घडतील. कुटुंबासाठी अनपेक्षित खर्च करावे लागतील.

कर्क

बदनामीपासून सावध राहावे लागेल. तीर्थयात्रा, प्रवासात अडथळे येतील. उत्तरार्धात नोकरीमध्ये पदोन्नती, पगारवाढ होईल. सप्ताहाच्या शेवटी अनपेक्षित लाभ होतील. शेअर्ससारख्या व्यवसायात फायदा होईल.

सिंह

प्रवास जपून करावेत. प्रॉपर्टीच्या कामात कायदेशीर अडथळे येतील. आर्थिक व्यवहार जपून करावेत. फसवणुकीपासून सावध राहावे. नोकरी-व्यवसायात अनपेक्षित बदल होतील. बदली-पदोन्नती होईल.

कन्या

पूर्वार्धात जोडीदाराची काळजी घ्यावी लागेल. कोर्टकचेरीच्या कामात मनस्ताप संभवतो. भागीदारीमध्ये नुकसान होईल. उत्तरार्धात जागा-प्रॉपर्टीच्या कामांतून लाभ मिळेल.

तूळ

नोकरीमध्ये मनस्ताप संभवतो. हाताखालील लोकांकडून असहकार्य राहील. उत्तरार्धात तरुणांचे विवाह जमतील. भागीदारीच्या व्यवसायात लाभ होईल. कोर्टकचेरीच्या कामात यश मिळेल.

वृश्चिक

शेअर्ससारख्या व्यवसायात नुकसान संभवते. तरुणांना प्रेमप्रकरणात मनस्ताप होईल. उत्तरार्धात नवीन नोकरीची संधी मिळेल. पगारवाढ होईल. जोडीदाराशी अनपेक्षितपणे दुरावा संभवतो.

धनू

सप्ताहाच्या सुरुवातीला मानसिक स्थिती खराब राहील. घरातील वातावरण अशांत राहील. उत्तरार्धात मुलांचे प्रश्न मार्गी लागतील. तरुणांना प्रेमप्रकरणात यश मिळेल. शेअर्स व्यवसायात फायदा होईल.

मकर

भावंडे-नातेवाइकांशी दुरावा निर्माण करणारी राहील. प्रवासात मनस्ताप संभवतो. मनःस्थिती खराब राहील. मात्र, उत्तरार्धात चंद्र-शुक्र शुभयोगामुळे घर-जागा, प्रॉपर्टीची कामे या होतील. घर-वाहन खरेदी होईल.

कुंभ

डोळ्यांची काळजी घ्यावी लागेल. कुटुंबातील सदस्यांशी अबोला निर्माण होईल. मात्र, उत्तरार्धात व चंद्र-शुक्र योगामुळे खेळ, कला क्षेत्रात प्रसिद्धी-पुरस्कार मिळतील.

मीन

नोकरी-व्यवसायात चांगले बदल होतील. निवडणुकीत यश मिळेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचे पद मिळेल. उत्पन्नात वाढ होईल. अनपेक्षित बातमी कळेल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahi Mirchi Recipe : झणझणीत दही मिरची एकदा ट्राय तर करा, जेवताना दोन चपात्या जास्त खाल

Maharashtra Live News Update: मुंबई महानगरपालिकेचा महापौर हा महायुतीचा होईल

वारं फिरलं! सोडून गेलेल्यांचे पुन्हा फोन, उमेदवारी मिळणार का? राजू पाटलांनी स्पष्टच सांगितलं

डोंबिवलीत प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; हिरवा पाऊस, गुलाबी रस्ते…आता चॉकलेटी धूर? व्हिडिओ व्हायरल

Jalgaon Politics: ज्यांचे तिकीट कापले जाईल, त्यांना आमदारकी; नाराज इच्छुकांसाठी भाजपची नवी ऑफर

SCROLL FOR NEXT