Horoscope Today in Marathi  Saam tv
राशिभविष्य

Todays Horoscope: या राशींच्या वैवाहिक जीवनात अडचणी येणार; पाहा आज कोणत्या राशींना होणार फायदा?

Zodiac signs married life difficulties: ६ फेब्रुवारी २०२६ हा दिवस काही राशींसाठी संधी घेऊन येणार आहे. तर काहींना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आलाय. करिअर, व्यवसाय, आरोग्य आणि कौटुंबिक जीवनात कोणाला फायदा होईल आणि कोणाला अडचणी येणार आहेत ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

मेष

आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. तुम्हाला एकामागून एक चांगल्या बातम्या ऐकायला मिळू शकतात. तुमचा बॉस तुम्हाला मोठी जबाबदारी देऊ शकतो.

वृषभ

आजचा दिवस तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या चांगला असणार आहे. तुम्हाला इतर कामांमध्ये खूप रस असणार आहे. तुमच्या जोडीदारासोबतच्या नात्यातील कटुता दूर होण्याची शक्यता आहे. अपेक्षेपेक्षा जास्त पैसे मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल.

मिथुन

आजचा दिवस तुमच्यासाठी गोंधळाचा असणार आहे. वाढत्या खर्चाकडे तुम्हाला बारकाईने लक्ष द्यावे लागणार आहे. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होणार असून तुम्ही त्यासाठी प्रयत्न कराल.

कर्क

आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे. न्यायालयात प्रलंबित असलेल्या मालमत्तेशी संबंधित कोणत्याही समस्या सोडवल्या जाऊ शकतात. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर ते फायदेशीर ठरणार आहे.

सिंह

आजचा दिवस तुमच्यासाठी काही नवीन संधी घेऊन येणार आहात. तुम्ही उत्साही आणि आत्मविश्वासू असणार आहात. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या लग्नात काही समस्या उद्भवू शकतात.

कन्या रास

आजचा दिवस तुमच्यासाठी काही नवीन कामं हाती घेण्याचा असणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवू शकणार आहात. विद्यार्थ्यांनी त्यांचा आळस बाजूला ठेवून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं.

तूळ

आजचा दिवस तुम्हाला तुमच्या बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवावं लागणार आहे. कोणाही दुसऱ्या व्यक्तीच्या प्रभावाखाली येऊ नका. तुमच्या जोडीदाराशी भांडण किंवा वाद होण्याची शक्यता आहे. लोक त्यांचे मतभेद सोडवू शकणार आहेत.

वृश्चिक रास

आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला जाणार आहे. तुमच्या मनात अनेक व्यवसायिक कल्पना येतील. तुमचे मित्रही तुमच्या कामात पूर्ण सहकार्य करतील. तुम्हाला काही वडिलोपार्जित मालमत्ता मिळू शकते, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.

धनु

आजचा दिवस तुमच्यासाठी मिश्र असणार आहे. आजच्या दिवशी कोणतेही निर्णय घाईघाईने निर्णय घेणं टाळा. तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत निष्काळजी राहू नये.

मकर

आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. तुमच्या उत्पन्नात वाढ झाल्याने तुम्ही आनंदी असणार आहात. तुमच्या कामातील कोणतेही चढ-उतार दूर होऊ शकणार आहेत.

कुंभ

आजचा दिवस तुमच्यासाठी खास असणार आहे. तुमच्या जोडीदारासोबत असलेले कोणतेही तणाव दूर होऊ शकतात. तुम्हाला तुमचं उत्पन्न आणि खर्च यांचा समतोल साधण्याची गरज आहे.

मीन

आजचा दिवस समस्यांपासून मुक्ततेचा असणार आहे. कोणतेही प्रलंबित काम पूर्ण होऊ शकतं. तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्याही दूर होतील. करिअरचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

१ लाखांत घरी आणा ७ सीटर कार; मायलेज जबरदस्त, काय आहे फिचर्स? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : पालघर - भगेरिया केमिकल कंपनी दुर्घटना अपडेट

BMC News: २० दिवसातच महायुतीनं दिलं मुंबईकरांना मोठं गिफ्ट; मालमत्ता कराबाबत मुंबई महापालिकेचा ऐतिहासिक निर्णय

Iran–Israel war : इस्रायलचा इराणच्या मंत्रालयावर एअरस्ट्राइक, एका मंत्र्यासह गुप्तचर विभागातील अनेक बड्या अधिकाऱ्यांचाही मृत्यू

Putla Design Mangalsutra: नववधूंच्या गळ्यात साडी आणि ड्रेसवर शोभून दिसतील 'हे' ७ लेटेस्ट ट्रेंडी पुतळा मंगळसूत्र

SCROLL FOR NEXT