Mars luck April 3 zodiac signs saam tv
राशिभविष्य

Grah Gochar: 'या' 3 राशींना आता 'नो टेन्शन', 3 एप्रिलपासून मंगळ चमकवणार तुमचं नशीब; हाती खेळणार नुसता पैसा

Mars luck April 3 zodiac signs: 7 जून 2025 रोजी पहाटे 2:28 वाजता मंगळ ग्रह कर्क राशीत असणार आहे. त्यानंतर तो सिंह राशीत प्रवेश करेल. कर्क राशीचा स्वामी चंद्र असल्यामुळे या काळात मंगळ दुर्बल स्थितीत राहणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रामध्ये मंगळाला ग्रहांचा सेनापती म्हटलं गेलंय. धैर्य, आत्मशक्ती, अग्नी, जमीन यांचा मंगळ कारक मानला जातो. मंगळ ग्रह ज्यावेळी त्याच्या राशीमध्ये बदल करतो, तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होत असतो. दरम्यान यावेळी काही राशींवर गोचरचा प्रभाव बराच चांगला असतो. मंगळ गुरुवारी 3 एप्रिल 2025 रोजी मध्यरात्री 1 वाजून 56 मिनिटांनी कर्क राशीत प्रवेश करणार आहे.

यावेळी मंगळ ग्रह मंगळ शनिवार, 7 जून 2025 रोजी पहाटे 2 वाजून 28 मिनिटांपर्यंत या राशीत राहणार आहे. यानंतर मंगळ सिंह राशीत प्रवेश करणार आहे. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. यामुळे मंगळ कर्क राशीत दुर्बल होणार आहे. यावेळी मंगळाचं गोचर कोणत्या राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक असणार आहे ते पाहूयात.

मेष रास

मेष राशीच्या चौथ्या भावावर या गोचराचा परिणाम होणार आहे. या काळात या राशीच्या व्यक्तींना प्रॉपर्टीशी संबंधित व्यवहार चांगला पैसा मिळवून देणार आहेत. जर तुम्ही वाहन किंवा जमीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. आईशी तुमचे संबंध चांगले राहणार आहेत.

सिंह रास

सिंह राशीच्या बाराव्या भावावर मंगळाचा प्रभाव राहणार आहे. या गोचरामुळे सिंह राशीच्या व्यक्तींना परदेशातून पैसा मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या नवीन संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला अचानक स्थिर पैसा मिळू शकणार आहे. आर्थिक कामात तुम्हाला चांगला लाभ मिळेल.

मीन रास

मंगळ तुमच्या पंचम भावावर प्रभाव पाडणार आहे. मंगळाच्या काळात विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. बिझनेसमनसाठी हा काळ खूप चांगला असणार आहे. प्रेमसंबंध दृढ होणार आहेत. तुम्हाला या काळात मनाजोगे लग्नाचे प्रस्ताव येणार आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला

Bihar Bhavan: मुंबईत उभारणार बिहार भवन; ३० मजली इमारत बांधणार, खर्च ३१४ कोटी; मनसेचा विरोध | VIDEO

Uddhav Thackeray : ऐन झेडपी निवडणुकीत शिंदेंचा ठाकरेंना झटका; बड्या नेत्यासह ३०० जणांनी सोडली साथ

Vitamin B Deficiency: सतत थकवा, चक्कर येतेय? Vitamin Bची असू शकते कमी, वेळीच ओळखा संपूर्ण लक्षणं

Vande Bharat Sleeper Train: वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये जेवणात काय काय मिळणार? वाचा मेन्यू

SCROLL FOR NEXT