
ज्योतिषशास्त्रात नऊ ग्रहांपैकी एक असलेल्या शनीला विशेष महत्त्व आहे. शनी हा मृत्यू, दु:ख, आजारपण यांचा कारक मानला जातो. शनिदेव एका विशिष्ट मार्गाने भ्रमण करतो ज्याचा परिणाम सर्व राशींच्या जीवनावर होतो. मात्र शनीच्या गोचरचा प्रत्येक वेळी लोकांवर अशुभ परिणाम होत नाही. काही वेळा शनी गोचर शुभ परिणामही देतात
वैदिक दिनदर्शिकेनुसार, 2 मार्च 2025 रोजी संध्याकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी शनिदेवाचे पूर्वभाद्रपद नक्षत्रात गोचर झालं आहे. पूर्वभाद्रपद नक्षत्र 27 नक्षत्रांपैकी २५ व्या स्थानावर आहे, ज्यावर गुरु म्हणजेच देवगुरू गुरू चे अधिपत्य मानलं जातं. यावेळी कोणत्या राशींच्या लोकांना लाभ होणार आहे ते पाहूयात.
वृषभ राशीच्या लोकांसाठी मागील दिवसांत शनीचं गोचर शुभ राहणार आहे. लव्ह लाईफमध्ये सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे मन प्रसन्न होणार आहे. शिक्षण क्षेत्रात केलेल्या प्रयत्नांना यश मिळणार आहे. एकाच कंपनीत दीर्घकाळ काम करणाऱ्यांना नव्या जबाबदाऱ्या देण्यात येणार आहेत.
कर्क राशीच्या लोकांच्या आरोग्यावर शनीच्या गोचरचा शुभ परिणाम होणार आहे. जुनाट आजारापासून लवकरच मुक्ती मिळण्याची शक्यता आहे. वडिलांशी वाद झाल्यास हा वाद मिटण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळतील.
वृश्चिक राशीच्या व्यक्तींवरही शनी गोचरचा शुभ प्रभाव पडणार आहे. विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना यश मिळणार आहे. शिक्षण क्षेत्रात यश मिळणार आहे. नोकरदार व्यक्तींना लवकरच आपल्या करिअरमध्ये मोठं यश मिळणार आहे. व्यापाऱ्यांच्या कुंडलीत धनलाभ होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.