Mangal Gochar saam tv
राशिभविष्य

Mangal Gochar 2025: 24 तासांनी मंग करणार नक्षत्र गोचर, 'या' राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल

Zodiac Signs Horoscope: आगामी २४ तासात एका मोठ्या नक्षत्राचे परिवर्तन होणार आहे, ज्याचा थेट परिणाम काही विशिष्ट राशींच्या लोकांवर होणार आहे. या बदलामुळे त्यांच्या जीवनात मोठे आणि सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक पंचांगानुसार यंदा बुधवारी ३ सप्टेंबर रोजी परिवर्तिनी एकादशी आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला हा पवित्र व्रत साजरा केला जातो. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. भक्त एकादशीचे उपवास करतात आणि मनोकामना पूर्ण व्हावी, आयुष्य समृद्ध व्हावे यासाठी प्रार्थना करतात. असे मानले जाते की या व्रतामुळे आयुष्य, भाग्य आणि सौख्यात वाढ होते.

ज्योतिषांच्या मते, याच दिवशी ग्रहांचे सेनापती मंगळदेव नक्षत्र बदलणार आहेत. मंगळदेवांच्या या हालचालीमुळे काही राशींच्या लोकांच्या जीवनात बदल दिसून येतील. मात्र या राशींनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

मंगळाचं नक्षत्र गोचर

३ सप्टेंबरला मंगळदेव चित्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या नक्षत्रात ते २२ सप्टेंबरपर्यंत राहतील आणि नंतर पुन्हा आपल्या स्थितीत बदल करणार आहेत. या गोचराचा थेट परिणाम काही राशींवर होणार आहे.

सिंह राशी

मंगळाची स्थिती बदलल्यामुळे सिंह राशीच्या लोकांना जीवनात नवीन वळण येणार आहे. यावेळी मन एकाग्र ठेवण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे स्वभाव चिडचिडा होण्याची शक्यता आहे. बोलण्यात कटुता येऊ शकते. चुकीचा निर्णय घेण्याचीही शक्यता राहणार आहे. वडील किंवा मोठ्या भावासोबत मतभेद होऊ शकतात.

मीन राशी

मंगळाच्या हालचालीमुळे मीन राशीच्या लोकांना काही शुभ कामांमध्ये अडथळे येऊ शकणार आहेत. तुमचे विचार इतरांशी जुळणार नाहीत. काही वेळा एकटे राहण्याची इच्छा होऊ शकते. यश मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. आर्थिकदृष्ट्या काळ थोडासा कठीण राहणार आहे. वाणी आणि रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वडीलधाऱ्यांशी नातेसंबंधात कटुता येऊ शकते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आपापसात भिडले

Nashik : शिंदेंच्या शिवसेना नेत्यावर ७ जणांचा कोयत्याने हल्ला, सपासप वार केल्याचा व्हिडिओ समोर

Ranjangaon Tourism: एप्रिल-मे सुट्ट्यांसाठी परफेक्ट प्लॅन, पुण्याजवळची ही प्रसिद्ध धार्मिक ठिकाण नक्की पाहा

नवऱ्याला सोडून पळाली मोनालिसा? नवरा फरमान मोनालिसाच्या शोधात?

Rice Idli Recipe: सकाळी नाश्त्याला बनवा शिळ्या भाताची मऊसूत इडली, अवघ्या १० मिनिटांत बनेल रेसिपी

SCROLL FOR NEXT