Sakshi Sunil Jadhav
तुम्हाला कामाच्या गडबडीत कुठे फिरता येत नसेल आणि फॅमिलीसोबत देवदर्शानी एक छोटी सहल काढायची असेल तर ही पुढील ठिकाणे एकदा नक्की पाहा.
पुणे जिल्ह्यातले प्रसिद्ध अष्टविनायकांपैकी एक असलेलं रांजणगाव महागणपती मंदिर हे श्रद्धा आणि निसर्ग यांचा सुंदर संगम मानलं जातं. उन्हाळ्यातही ईथे भक्तांची मोठी गर्दी असते.
रांजणगाव महागणपती हे मंदिर पुणे-अहमदनगर महामार्गावर, पुण्यापासून सुमारे 50 किमी अंतरावर आहे. अष्टविनायक यात्रेतले हे एक महत्त्वाचे स्थान आहे.
रांजणगावचा गणपती हा महागणपती म्हणून ओळखला जातो. असं मानले जातं की, इथे गणपतीने त्रिपुरासुराचा वध केला होता.
हायवेच्या रस्त्याने पुण्याहून बस किंवा कारने सहज जाता येतं. रेल्वेने जवळचे रेल्वे स्टेशन पुणे रेल्वेने प्रवास होतो, तर विमानाने जवळचे विमानतळ पुणे विमानतळ हे जवळ पडतं.
उन्हाळ्यात ईथे तुम्हाला तापमान 35°C ते 40°C दरम्यान असतं. सकाळी आणि संध्याकाळी वातावरण खूप सुंदर असतं.
रांजणगाव परिसरात हिरवळ, मोकळी शेती आणि शांत वातावरण अनुभवायला मिळेल. सकाळच्या वेळी पक्ष्यांचा किलबिलाट आणि थंड वारा मनाला प्रसन्न करतो.
शिर्डी, ओझर गणपती मंदिर, लेण्याद्री गुंफा, ऐतिहासिक बौद्ध लेणी ही या ठिकाणा जवळची प्रसिद्ध ठिकाणे आहेत.
एप्रिल-मे महिन्यात परिसरात आंब्यांचा सुगंध खूप दरवळतो. गावाकडची जीवनशैली आणि स्थानिक बाजार पाहण्याचा वेगळाच आनंद मिळतो.