Surya Nakshatra Gochar 2025 saam tv
राशिभविष्य

Surya Gochar 2026: फेब्रुवारीमध्ये ३ वेळा गोचर करणार सूर्य ग्रह; 'या' राशींकडे दुप्पट वेगाने येणार पैसा

Surya Gochar 2026 Rashifal February: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे गोचर व्यक्तीच्या जीवनावर मोठा परिणाम करतात. फेब्रुवारी महिन्यात सूर्य तीन वेळा राशी बदलणार आहे. हा विशेष योग काही राशींना आर्थिक प्रगती, संपत्ती वाढ आणि करिअरमध्ये यश देणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक कॅलेंडरनुसार, ग्रहांचा राजा सूर्य फेब्रुवारी महिन्यात तीन वेळा त्याच्या राशीत बदल करणार आहे. सन्मान आणि प्रतिष्ठेचा कारक सूर्य ६ फेब्रुवारी २०२६ रोजी धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. त्यानंतर १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सूर्य मकर राशी सोडून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे.

अखेरीस १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सूर्य शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. सूर्याच्या काही राशींचं भाग्य चमकू शकणार आहे. या राशींनाही पद आणि प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता आहे. यावेळी कोणत्या राशींना लाभ होणार आहे ते पाहूयात.

धनु रास

सूर्याच्या चालीतील तीन वेळा होणारा बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. त्यामुळे या काळात तुमचं धैर्य वाढणार आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी, व्यवसाय वाढीसाठी हा चांगला काळ आहे. तुम्हाला सरकारी कामातही सकारात्मक परिणाम दिसू शकतात.

सिंह रास

सूर्याच्या हालचालीतील तीन वेळा होणारा बदल सिंह राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरू शकणार आहे. या काळात तुमचं उत्पन्न लक्षणीयरीत्या वाढू शकते. यावेळी उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येऊ शकतात. या गोचर दरम्यान तुमचं लव्ह लाईव्ह चांगलं राहणार आहे. अविवाहितांना जोडीदार मिळू शकेल.

मेष रास

सूर्याच्या चालीतील तीन वेळा होणारा बदल तुमच्यासाठी अनुकूल ठरण्याची शक्यता आहे. हा काळ तुमच्या कामात आणि व्यवसायात लक्षणीय प्रगती आणू शकतो. तुमच्या व्यावसायिक जीवनासाठी हा चांगला काळ आहे. तुम्हाला नेतृत्व किंवा मार्गदर्शनाची भूमिका घेण्याची संधी मिळू शकते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diet Pohe: वजन कमी करायचंय? मग डाएटमध्ये अशापद्धतीने खा पोहे खा, नोट करा रेसिपीच्या टिप्स

भाजपची ताकद वाढली; राऊतांचा शेकडो शिवसैनिकांसह प्रवेश, बदलापुरातील राजकीय समीकरण बदललं

Maharashtra Live News Update: अजित पवार यांच्या उपस्थितीत इच्छुक सदस्यांची जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी बैठक

Gas Cylinder Expiry: तुमचा गॅस सिलेंडर एक्सापायर तर झाला नाही ना? आताच असं तपासा, अन्यथा...

Pune Tempo Accident: पुण्यात अपघाताचा थरार! अनियंत्रित टेम्पोची फुटपाथवरील अनेक वाहनांना धडक

SCROLL FOR NEXT