Shukra Gochar saam tv
राशिभविष्य

Shukra Gochar : मे महिन्यापासून चमकणार 'या' राशींचं नशीब; शुक्राचं गोचर करणार मालामाल

Shukra Gochar 2025: एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये गोचर करतात. येत्या मे महिन्यात देखील अनेक ग्रहांचं गोचर होणार आहे. शुक्र ग्रह येत्या काळात गोचर करणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये गोचर करतात. यावेळी काही ग्रहांचं गोचर शुभ मानलं जातं. यामधील शुक्र ग्रह हा धन, वैभव, सन्मान, आनंद, समृद्धी, सुख यांचा कारक मानलं जातं. शुक्र सध्या मीन राशीत असून मे महिन्याच्या अखेरीस म्हणजे ३१ मे रोजी मीन राशी सोडून मेष राशीत प्रवेश करणार आहे.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, धनदाता शुक्र ग्रह ३१ मे रोजी २०२५ रोजी सकाळी ११ वाजून ४२ मिनिटांनी मंगळाच्या मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे. २९ जूनपर्यंत या राशीत राहणार आहे. यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना फायदा होणार आहे ते पाहूयात.

मिथुन रास

या राशीच्या लोकांसाठी, शुक्राचे मेष राशीत प्रवेश फायदेशीर ठरू शकणार आहे. मित्र आणि कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्हाला व्यवसायात नफा मिळू शकतो. आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला खूप फायदे मिळू शकतात. तुम्ही पैसे वाचवण्यातही यशस्वी होऊ शकता.

तूळ रास

या राशीच्या लोकांसाठीही शुक्र राशीचा मेष राशीत प्रवेश लकी ठरू शकतो. कोणत्याही कामात मित्रांकडून पूर्ण पाठिंबा मिळू शकतो. नोकरीत असलेल्या समस्या संपुष्टात येऊ शकतात. व्यवसायाच्या क्षेत्रातही तुम्हाला फायदा होऊ शकणार आहे. भागीदारीत केलेल्या व्यवसायातही तुम्हाला नफा मिळू शकतो.

कुंभ रास

या राशीच्या लोकांसाठी शुक्र देखील फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात नोकरीतही तुम्हाला खूप फायदे मिळू शकतात. नशीब तुमच्या बाजूने असू शकणार आहे. तुमच्या कामाचं कौतुक होईल आणि तुमच्यावर काही मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. पगारवाढी सोबतच पदोन्नतीचीही शक्यता आहे. जोडीदारासोबतही चांगला समन्वय राहणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Gochar 2025: सप्टेंबर महिन्यात पालटणार 'या' राशींचं नशीब; मंगळाच्या गोचरने होणार लाभ

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

SCROLL FOR NEXT