Surya Shani Navpancham Drishti saam tv
राशिभविष्य

Shukraditya Rajyog: 9 ऑक्टोबरपासून 'या' राशींचं नशीब फळफळणार; शुक्रादित्य राजयोगामुळे मिळणार पैसा

Shukraditya Rajyog 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह एका विशिष्ट कालावधीनंतर राशी बदलत असतात, ज्यामुळे विविध प्रकारचे शुभ आणि शक्तिशाली राजयोग (Raja Yoga) तयार होतात. यातीलच एक अत्यंत महत्त्वाचा योग म्हणजे ‘शुक्रादित्य राजयोग’

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुरु शुक्र हे प्रेम, आकर्षण, संपत्ती, वैभव, भौतिक सुख सुविधा, सौंदर्य आणि विवाह यांचा प्रमुख कारक मानलं जातात. त्यामुळे शुक्राच्या स्थितीमध्ये होणारा कोणताही बदल हा बारा राशींच्या जीवनावर काही ना काही प्रकारे प्रभाव टाकतोच.

ऑक्टोबर महिन्यात शुक्र आपल्या नीच राशी म्हणजे कन्या राशीत प्रवेश करणार आहेत. सध्या या राशीत सूर्य आधीपासूनच स्थित आहे. त्यामुळे या दोन ग्रहांच्या संयोगातून शुक्रादित्य योगाची निर्मिती होणार आहे. हा राजयोग तयार झाल्यामुळे काही राशींच्या जातकांसाठी हे दिवस विशेष फलदायी ठरू शकतात. व्यवसाय, नोकरी आणि वैयक्तिक जीवनात काही ठोस सकारात्मक बदल अनुभवायला मिळू शकतात.

वैदिक गणनेनुसार, शुक्र ९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजून ५५ मिनिटांनी कन्या राशीत प्रवेश करणार आहेत. सूर्य आणि शुक्र यांचा हा संयोग १७ ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे. त्यानंतर सूर्य तुला राशीत प्रवेश करतील आणि हा योग समाप्त होणार आहे.

वृषभ राशी

या राशीच्या पंचम भावात शुक्रादित्य योगाची निर्मिती होणार आहे. त्यामुळे वृषभ राशीच्या व्यक्तींना प्रेमसंबंध, वैवाहिक जीवन आणि संततीसंबंधी बाबतीत चांगले परिणाम दिसून येणार आहेत. दांपत्य जीवनातील जुन्या तणावांचा शेवट होऊन संबंध अधिक सौहार्दपूर्ण होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळू शकते.

सिंह राशी

सिंह राशीत हा योग दुसऱ्या भावात निर्माण होणार आहे. या राशीच्या व्यक्तींमध्ये कला, संगीत यांच्यात अधिक रस निर्माण होईल. कुटुंबातील नातेसंबंध अधिक घट्ट होणार आहेत. घरातील वातावरण आनंदी राहणार आहे. दीर्घकाळापासून सुरू असलेले अडथळे दूर होतील आणि कामकाजात गती येईल.

मकर राशी

मकर राशीच्या नवव्या भावात सूर्य–शुक्राचा संयोग होणार आहे. त्यामुळे हा कालावधी या राशीसाठी अतिशय भाग्यवर्धक ठरू शकणार आहे. नशिबाची साथ मिळणार आहे. घरात कोणतंही शुभकार्य होण्याची शक्यता आहे. करिअर किंवा व्यवसाय क्षेत्रात मेहनतीनुसार, योग्य फळ मिळणार आहे. लव्ह लाइफ देखील आनंदी राहणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: नाशिकमध्ये 'आघाडीला' भगदाड, तब्बल २०० निष्ठावंत पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

National cancer awareness day: भारतात सर्वाधिक वाढणारे ५ कॅन्सरचे प्रकार; शरीरात 'हे' बदल दिसल्यास लगेच जा डॉक्टरांकडे

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना उबाठा गटाचे आंदोलन

Farah Khan: '…म्हणून फिल्म सेटवर कलाकार प्रेमात पडतात'; फराह खानने सांगितलं बॉलिवूडचं डार्क सिक्रेट

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! दररोज २०० रुपये गुंतवा अन् आयुष्यभर पेन्शन मिळवा

SCROLL FOR NEXT