Shukra Gochar saam tv
राशिभविष्य

Shukra Gochar: 20 डिसेंबरपासून या राशींचं नशीब बदलणार; भौतिक सुखासह बँक बॅलन्समध्येही होणार मोठी वाढ

Venus Planet Gochar: ज्योतिषांच्या मते, २० डिसेंबरपासून काही राशींसाठी ग्रहस्थितीत मोठा बदल होणार आहे. या बदलामुळे त्यांचे भाग्य उजळणार असून, भौतिक सुखसोयींसोबतच बँक बॅलन्समध्येही मोठी वाढ होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला धन आणि वैभव यांचा दाता मानण्यात येतं. साधारणपणे शुक्र ग्रह दर महिन्याभराने राशी परिवर्तन करतो. २० डिसेंबर रोजी शुक्र ग्रह धनु राशीत प्रवेश करणार आहेत.

ज्योतिष्य तज्ज्ञांप्रमाणे धनु राशीवर गुरु ग्रहाचं आधिपत्य आहे. त्यामुळे गुरुच्या राशीत शुक्राच्या गोचरामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे. या काळात आकस्मिक धनलाभ होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे काही राशींच्या व्यक्तींना भाग्योदयाची संधी निर्माण होणार आहे.

तूळ रास (Libra Zodiac)

तूळ राशीच्या लोकांसाठी शुक्र ग्रहाचा हा गोचर लाभदायी ठरू शकणार आहे. तुमच्या साहसात आणि पराक्रमात वाढ होण्याची शक्यता आहे. कार्यस्थळी तुमचा प्रभाव वाढेल आणि शत्रू कमकुवत होणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वात नवा निखार दिसून येईल. विदेशाशी संबंधित काम करणाऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो.

कन्या रास (Kanya Zodiac)

कन्या राशीच्या लोकांसाठी शुक्र ग्रहाचा गोचरही लाभदायी ठरू शकणार आहे. या काळात तुमचे नातेसंबंध जोडीदारासोबत अधिक चांगले होणार आहे. रोमँस आणि प्रेमळ क्षणांनी नात्यात रंगत येणार आहे. या काळात तुम्ही मोठा फ्लॅट खरेदी करू शकता. कुटुंबातील व्यक्तींकडून तुम्हाला आनंदाची बातमी मिळणार आहे.

धनु रास (Dhanu Zodiac)

धनु राशीच्या लोकांसाठी शुक्र ग्रहाचं राशी परिवर्तन अत्यंत शुभ ठरू शकणार आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे. या काळात तुमची प्रतिष्ठा उंचावणार आहे. भाग्य तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला यशस्वी करण्यात मदत करणार आहेत. कोणत्या समस्येमध्ये अडकला असाल तर त्यातून सुटका होईल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tejashri Pradhan: तेजश्री प्रधानची गगन भरारी! कला विश्वातील मोठ्या पुरस्कारानं गौरवलं, म्हणाली - "उरी विश्वास बाळगून..."

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरच्या टीव्ही सेंटर परिसरात हिट अँड रन

Mahima Chaudhary Marriage: 52 व्या वर्षी महिमा चौधरीनं उरकलं दुसरं लग्न, लग्नाचे फोटो आले समोर

Hysterectomy effects: महिलांच्या शरीरातून गर्भाशय काढल्यानंतर कोणते बदल होतात? यामागे कोणती कारणं असतात?

Shocking : Pune: २ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, आईच्या प्रियकराचं भयंकर कृत्य; मालिश करायला सांगायचा अन्...

SCROLL FOR NEXT