Mangal Gochar saam tv
राशिभविष्य

Mangal Gochar 2025: सप्टेंबर महिन्यात पालटणार 'या' राशींचं नशीब; मंगळाच्या गोचरने होणार लाभ

Mars transit September 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे गोचर आणि त्यांच्या स्थितीतील बदल प्रत्येक राशीच्या जीवनावर मोठा प्रभाव पाडतात. सप्टेंबर २०२५ महिना ज्योतिषीय दृष्टिकोनातून खूप खास असणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषानुसार ग्रह ठराविक कालावधीनंतर नक्षत्र व राशी बदलत असतात आणि याचा थेट परिणाम मानवाच्या जीवनावर होत असतो. येत्या सप्टेंबर महिन्यात ग्रहांचा सेनापती मानला जाणारा मंगळ ३ वेळा आपली चाल बदलणार आहे.

३ सप्टेंबर २०२५ रोजी मंगळ चित्रा नक्षत्रात प्रवेश करणार असून ते २३ सप्टेंबरच्या रात्रीपर्यंत तिथेच राहणार आहेत. यानंतर २३ सप्टेंबरला ते स्वाती नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. मात्र याआधी १३ सप्टेंबर रोजी मंगळाचे तुला राशीत गोचर होणार आहे. अशा प्रकारे महिन्याभरात मंगळाच्या हालचालीत होणाऱ्या या तीन बदलांचा काही राशींवर मोठा सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे.

यावेळी काही राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे तर काहींना त्यांच्या करियरमध्ये चांगली संधी मिळू शकणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी मंगळाचं गोचर अतिशय फायदेशीर ठरणार आहे. या काळात तुम्ही वाहन खरेदी किंवा प्रॉपर्टीशी संबंधित व्यवहार करू शकता. नोकरी करणाऱ्यांना आपली कार्यशैली सुधारण्याची संधी मिळेल. नातेवाईक व जवळच्या लोकांशी संबंध दृढ होतील आणि त्यातूनच लाभ होण्याची शक्यता आहे.

मेष राशी

मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ धैर्य आणि आत्मविश्वास वाढवणारा असणार आहे. या कालावधीत सुखसुविधा वाढू शकतात. पैशाचे नवे स्रोत निर्माण होतील आणि अडकलेला पैसा हातात येणार आहे. नोकरी करणाऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होईल.

कुंभ राशी

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी मंगळाची तीन वेळची चाल अनुकूल ठरणार आहे. या काळात उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे. नवे स्रोत मिळाल्यामुळे पैसा हातात येणार आहे. नोकरी करणाऱ्यांना प्रभावशाली व्यक्तींचा सहवास मिळणार आहे. कामकाजात सुधारणा होणार आहे.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhivtas Waterfall : पाचशे फुटांवरून झेपावणारा भिवतास वॉटर फॉल; निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच!

Tejaswini Pandit: 'आई...' एवढेच उच्चारले अन् तेजस्विनी पंडित ढसाढसा रडली…; हृदय पिळवटून टाकणारा क्षण, VIEDO

केवळ चपातीच नाही तर तुम्ही गव्हाच्या पीठापासून बनवू शकता 'हे' टेस्टी फूड्स

Rahul Gandhi : मतचोरी होऊ देणार नाही, राहुल गांधी आयोगावर कडाडले

Painganga River Flood: पैनगंगा नदीला पूर, सहस्रकुंड धबधब्याने घेतले रौद्ररूप; पूरामध्ये पूल गेला वाहून, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT