लादी पुसण्याच्या पाण्यामध्ये टाका हे 3 पदार्थ; मुंग्या आणि झुरळे मिनिटांत होतील गायब

Manasvi Choudhary

पावसाळ्यात घराची ठेवा स्वच्छता

पावसाला सुरूवात झाली की घराची स्वच्छता ठेवणे अत्यंत महत्वाचे असते. हवेतील दमटपणामुळे आणि ओलाव्यामुळे घरात माशा, मुंग्या, डास आणि झुरळांचा सुळसुळाट होतो.

Monsoon Home Care Tips | Saam Tv

किटकनाशके पळवण्याचा सोपा घरगुती उपाय

या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी केवळ बाजारातील महागडे फिनाइल व केमिकल उत्पादने वापरून फरक पडत नाही. यासाठी आज आम्ही तुम्हाला एक सोपा घरगुती उपाय सांगणार आहे

Monsoon Home Care Tips

लादी पुसण्याच्या पाण्यामध्ये मिसळा हे पदार्थ

लादी पुसताना तुम्ही पाण्यामध्ये काही पदार्थ मिसळले तर मुंग्या, झुरळं आपोआप पळून जातील.

Natural Insect Repellent

कापूर, कडुलिंबाचे तेल आणि मीठ

लादी पुसण्याच्या पाण्यामध्ये कोणतेही क्लिनिंग केमिकल न वापरता कापूर, कडुलिंबाचं तेल आणि मीठ हे पदार्थ मिक्स करा. या पाण्याने लादी पुसल्याने किटकांना दूर ठेवण्यास मदत होते व घरही स्वच्छ होते.

Home Hygiene Tips

असा होतो फायदा

१) कापराचा वास माश्या, डास आणि मुंग्यांना सहन होत नाही. लादी पुसण्याच्या पाण्यात कापराची पावडर टाकल्याने घरातील दुर्गंधी दूर होते आणि कीटकही लांब पळतात.

Camphor | yandex

२) कडुलिंबामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि कीटकनाशक गुणधर्म असतात. कडुलिंबाच्या तेल पाण्यात टाकल्याने जंतू नष्ट होतात आणि झुरळे मरतात.

३) मीठ हे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि नैसर्गिक जंतुनाशक म्हणून वापरले जाते. मिठाच्या पाण्याने लादी पुसल्यास मुंग्या आणि माश्या जमिनीवर बसत नाहीत.

Neem Oil

NEXT: पावसाळ्यात डायबिटीजचा धोका का वाढतो?

Diabetes Health Tips
येथे क्लिक करा...