Manasvi Choudhary
पावसाळ्यात वातावरणीय बदलामुळे बॅक्टेरिया तसेच बुरशीजन्य संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो. पावसाळ्यात शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी होते म्हणून आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे.
डायबिटीज असणाऱ्या रूग्णांनी पावसाळ्यात काळजी घेणे महत्वाचे आहे. पावसाळ्यात रक्तातील साखर वाढल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम उद्भवू शकतात.
पावसाळा सुरू झाला की आपण गरमागरम भजी, समोसे किंवा तेलकट-तिखट पदार्थ खातो. मात्र, डायबिटीजच्या रूग्णांसाठी हे पदार्थ रक्तातील साखर झपाट्याने वाढवतात यामुळे डायबिटीजचा धोका वाढू शकतो.
पावसात भिजल्यामुळे पायामध्ये बुरशीजन्य संसर्ग आणि त्वचेची ॲलर्जी होण्याचा धोका सर्वाधिक असतो. त्यामुळे पावसाळ्यात डायबिटीजच्या रूग्णांनी आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे.
१) पावसाळ्यात बाहेरील उघड्यावरील अन्न किंवा स्ट्रीट फूड खाणे पूर्णपणे टाळावे. यामुळे पोटाचे विकार आणि इन्फेक्शन होऊ शकते.
२) नेहमी घरी बनवलेले, कमी तेलाचे, ताजे आणि गरम अन्नपदार्थ खा.
१) शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहण्यासाठी आहारात हळद, आले, लसूण, मेथी दाणे आणि अँटी-ऑक्सिडंट्सयुक्त पदार्थांचा समावेश करा.
१) पावसाळ्यात पालेभाज्या आणि फळांवर जंतू किंवा कीटक असण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच, कोणतीही भाजी किंवा फळ खाण्यापूर्वी कोमट पाण्याने किंवा मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.