Budh Gochar 2024 saam tv
राशिभविष्य

Budh Gochar: बुध ग्रहाचा राशी बदल 'या' राशींसाठी ठरणार घातक; भासेल पैशांची कमतरता, सावध रहा!

Surabhi Jagdish

वैदिक ज्योतिष्य़ शास्त्रानुसार, एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येतो. यामध्ये काही राशींना सकारात्मक तर काही राशींना नकारात्मक प्रभावाचा सामना करावा लागतो.

येत्या २ दिवसांनी म्हणजे १० ऑक्टोबर रोजी बुध ग्रह गोचर करणार आहे. यावेळी बुध तूळ राशीत प्रवेश करणार असून याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी काही राशींना या काळात सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. २९ ऑक्टोबरपर्यंत बुध ग्रह तूळ राशीत विराजमान आहेत. हा काळ कोणत्या राशींसाठी कठीण आहे ते पाहूयात.

मेष रास

मेष राशींच्या व्यक्तींसाठी बुध ग्रहाचं गोचर शुभ राहणार नाही. तुमच्या कामावर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. तुम्हाला अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागणार आहे. तुमचा पगार हाती राहणर नाही. आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. व्यवसायात नुकसान सहन करावा लागू शकतं. तुमच्या जोडीदाराशी काही मतभेद होऊ शकतात.

सिंह रास

बुधाचं गोचर सिंह राशीच्या लोकांना अशुभ परिणाम देऊ शकतात. पुन्हा एकदा तुमची कामगिरी कमी होऊ शकते. या काळात कोणतेही मोठे नवीन व्यावसायिक व्यवहार किंवा करार करु नका. ऑफिसमध्ये कोणीतरी तुमच्याबद्दल तक्रार करणार आहे. धनाहानी होण्याची चिन्ह आहेत. या राशीच्या लोकांना त्यांच्या कामात अडथळे येणार आहेत.

कुंभ रास

प्रवास आणि खर्चामुळे कुंभ राशीच्या लोकांना त्रास होणार आहे. विद्यार्थ्यांनी विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. आर्थिक संकट येऊ शकतं. घरात मतभेद होऊ शकतात. नोकरदारांच्या पदोन्नतीला ब्रेक लागणार आहे. या लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावा लागणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationships Tips : तुम्ही चुकीच्या पार्टनरची निवड केली आहे? हे संकेत दिसताच माघार घ्या

IND vs NZ : भारताविरोधात किवीच्या संघाची घोषणा, पहिल्या सामन्याला विल्यमसन मुकणार, कुणाला मिळाली संधी?

UPI Transaction Limit : ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांना मोठा दिलासा; आरबीआयने वाढवली UPI Lite पेमेंटची मर्यादा

Marathi News Live Updates: पुण्यात ⁠राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू

Cancer: मृत्यूचा धोका टाळणाऱ्या ४ ब्लड टेस्ट; कॅन्सरला प्राथमिक टप्प्यात शोधून काढतील!

SCROLL FOR NEXT