Surya Rashi Parivartan
Surya Rashi Parivartan Saam Tv
राशिभविष्य

Surya Rashi Parivartan: 14 जानेवारीपासून या राशींना चांगले दिवस, प्रमोशनची शक्यता

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Surya Rashi Parivartan 2022: मुंबई : नवीन वर्षात सूर्याचं पहिलं राशी परिवर्तन (Surya Rashi Parivartan 2022) 14 जानेवारी रोजी होणार आहे. यावेळी सूर्यदेव धनू राशीत असतो. 14 जानेवारी रोजी तो मकर राशीत प्रवेश करेल. ज्योतिष शास्त्रानूसार सूर्याचा राशी बदल खूप खास आहे. कारण तो सर्व राशींचा राजा मानला जातो. सूर्याचे राशी बदलल्याने खरमास संपेल, तर राशींवरही त्याचा परिणाम होईल. सूर्याचा हा राशी बदल काही राशींसाठी फायदेशीर ठरेल. या राशी कोणत्या आहेत जाणून घेऊ - (Surya Rashi Parivartan 2022 Will Bring Good Luck For These Zodiac Signs)

वृषभ (Taurus)

वृषभ राशी (Zodiac)च्या लोकांसाठी सूर्याचे राशी परिवर्तन शुभ सिद्ध होईल. सूर्याचे संक्रमण होताच तुम्हाला नशिबाची साथ लाभेल. सूर्याच्या संक्रमणादरम्यान तुम्ही जे कुठले काम कराल त्यात तुम्हाला सकारात्मक लाभ मिळेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल, त्यामुळे मन शांत आणि आनंदी राहील. सूर्यदेवाला नियमित जल अर्पण केल्यास विशेष लाभ होईल. यासोबतच समाजात मान-सन्मान मिळेल. याशिवाय, नोकरीत प्रगती होईल.

मकर (Capricorn)

सूर्य राशी बदलून मकर राशीत येईल. त्यामुळे या राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे. नोकरीत यश आणि मान-सन्मान मिळेल. सरकारी नोकरीत काम करणाऱ्यांना प्रमोशन मिळू शकते. याशिवाय, जे लोक सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांना चांगली बातमी मिळू शकते.

वृश्चिक (Scorpio)

सूर्याचे हे राशी परिवर्तन तुमच्या सर्व कामांसाठी शुभ सिद्ध होईल. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुम्हाला कामात पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. रोजचे उत्पन्नही वाढेल. याशिवाय, जमीनीशी संबंधित काम करणाऱ्यांनाही सूर्याच्या परिवर्तनाचा लाभ होईल.

सिंह (Leo)

सूर्याचे हे राशी परिवर्तन सिंह राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे सिंह राशीच्या व्यक्तींचे आर्थिक जीवन आनंदी राहील. नोकरदार व्यक्तींना पदोन्नतीबाबतची चांगली बातमी मिळू शकते. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे यशस्वीपणे पूर्ण होतील. व्यवसायात अडकलेले पैसे परत मिळतील. याशिवाय, परिवर्तनादरम्यान तुम्हाला कठोर परिश्रमाचा पूर्ण लाभ मिळेल.

(टीप - येथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसाधारण धार्मिक मान्यता आणि माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. याचं कुठलंही वैज्ञानिक कारण नाही. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांना सल्ला घ्या...)

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News: बहिणीचा ड्रायव्हरसोबत प्रेमविवाह; भाऊ संतापला, रागाच्या भरात केलं भयानक कांड

Gulkand Recipe: गुलकंद कसं बनवायचं? एकदम सोपी रेसिपी

GT vs RCB,IPL 2024: गुजरातच्या संघात स्टार फलंदाजाचं होणार कमबॅक; अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११

Tulsi Vastu Tips: तुळशीला सकाळी 'या' वेळी घाला पाणी; होईल आर्थिक लाभ

Today's Marathi News Live: नाशिकच्या जागेवरुन छगन भुजबळांचा महायुतीला खोचक टोला

SCROLL FOR NEXT