Horoscope In Marathi Saam tv
राशिभविष्य

Sunday Horoscope : अडचणीचा सामना करावा लागणार; 5 राशींच्या लोकांना मनोबल सांभाळावे लागेल

Sunday Horoscope in Marathi : आज काही राशींच्या लोकांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे. काहींना मनोबल सांभाळावे लागेल.

Anjali Potdar

पंचांग

रविवार,२ नोव्हेंबर २०२५,कार्तिक शुक्लपक्ष,भागवत एकादशी,तुलसी विवाहारंभ,पंढरपूर यात्रा,चातु्र्मास्य समाप्ति.

तिथी-एकादशी ०७|३२

द्वादशी २१|०८

रास-कुंभ ११|२७ नं. मीन

नक्षत्र-पूर्वा भाद्रपदा

योग-व्याघात

करण-विष्टीकरण

दिनविशेष-क्षयतिथी

मेष - चर तत्वाची अग्नी रास आपली आहे. आज तब्येतीच्या तक्रारी थोड्या जपाव्या लागतील. उष्णता वाढेल. कामात मात्र जोर असेल. नवीन नाते, परिचयांनी समृद्ध व्हाल.

वृषभ - राजकारण आणि समाजकारण विषयी आज विशेष ओढ तुम्हाला वाटेल. पैशाला महत्व ठेवून कामे कराल आणि ती पूर्ततेकडे जातील. दिवस चांगला आहे. कर्म करत रहा फळ नक्की चांगले मिळेल.

मिथुन - नातवंड सौख्यच्या दृष्टीने दिवस सुंदर आहे. मनामध्ये अनेक दिवस राहिलेल्या गोष्टी आज सहज होताना दिसतील. लांबच्या प्रवासाच्या दृष्टीने दिवस सुखकर आहे.

कर्क - एखाद्या वलयामध्ये अडकल्याची भावना होईल. त्याच त्याच गोष्टी वारंवार मागे लागतील. अडचणीतून मात्र एकट्यालाच वाट काढावी लागेल. अति पैशाच्या मोहापायी चुकीची वाटचाल आज करू नका.

सिंह - व्यवसायाला नव्याने वाटा फुटतील. भागीदाराला विशेष महत्त्व देऊन आपल्या पद्धतीने त्यांच्याकडून कामे करून घ्यावे लागतील. नव्याने कामाला उत्साह येईल.

कन्या - मामाकडून विशेष फायद्याचा दिवस आहे. गुप्त शत्रू त्रास देतील. अडचणीचा सामना करून दिवस काढावा लागेल. तर नव्याने वाट मिळेल.

तूळ - आज धानयोगासाठी दिवस चांगला आहे. शेअर्समधील गुंतवणूक, लॉटरी, रेस यामधून फायदा होईल. लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावर राहणार आहे. संततीकडून मनासारख्या बातम्या कानी येतील.

वृश्चिक - अथक परिश्रम करणारी आपली रास आहे. आपल्यासाठी कोण काय करतो यापेक्षा आपण इतरांसाठी किती करू शकतो हा आपण विचार करा. कुटुंबीयांसाठी सुखाचे चार क्षण येतील अशा काही गोष्टी आज तुम्ही कराल. जमिनीच्या व्यवहारात यश आहे.

धनु - पराक्रमाची शर्थ होईल. मात्र निर्णय घेताना कचराई नको. जवळच्या प्रवासातून फायदा आहे आज आपल्या वाणीला, वक्तृत्वाला विशेष धार येईल. इतरांवर आपला चांगला प्रभाव असेल.

मकर - सोबतीचा करार असा काहीसा दिवस आहे. आपल्या लोकांकडून मनासारख्या गोष्टी आणि भक्कम आधार आज तुम्हाला मिळणार आहे. पैशाशी निगडित व्यवहार आणि गुंतवणूक करण्यासाठी आज योग्य दिशा मिळेल.

कुंभ - भले भले आले गेले पण आपण आपल्यापासून आपल्या ध्येयापासून वंचित होत नाही. काही गोष्टी मनामध्ये ठरवून आज कार्यरत रहाल. सकारात्मकता वाढीला लागेल. शनीची आवडती असणारी आपली रास सुखद गोष्टी घडतील.

मीन - जे ठरवले आहे ते करण्यामध्ये आज व्यस्तता असेल. आपल्या साध्या आणि चांगल्या स्वभावाचा फायदा जवळचे लोक घेतात हे पाहून वाईट वाटेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: बहिणीच्या दिराने पळवून नेलं, अल्पवयीन मुलीसोबत शरीरसंबंध; गरोदर पीडितेला रेल्वे स्टेशनवर सोडून पळाला

Anil Ambani : अंबानींवर ईडीची मोठी कारवाई, ३००० कोटींची संपत्ती जप्त, फ्लॅट, प्लॉट अन् ऑफिसला कुलूप

Maharashtra Live News Update: 'सरकारने शेतकऱ्यांची थट्टा लावली आहे' - उद्धव ठाकरे

'६,५०० रूपयातील साडेचार मॅडमच्या खात्यात पाठव'; शेतकऱ्याच्या अनुदानावर शासकीय कर्मचाऱ्याचा डोळा, Audio क्लिप व्हायरल

Bank Holidays : नोव्हेंबरमध्ये तब्बल ११ दिवस बँका बंद, डिजिटल सेवा मात्र २४ तास सुरू राहणार | VIDEO

SCROLL FOR NEXT