Sunday Horoscope In Marathi Saam tv
राशिभविष्य

Horoscope: प्रगतीसह आज धनलाभाचे योग; जाणून घ्या रविवारचं राशीभविष्य

Sunday Horoscope In Marathi: आजचा दिवस अनेक राशींसाठी आनंदाचा असणार आहे. पण नेमकं कोणत्या राशींसाठी रविवारचा दिवस आनंदाचा असेल हे जाणून घेऊ.

Anjali Potdar

रविवार,५ ऑक्टोबर २०२५,अश्विन शुक्लपक्ष.

तिथी-त्रयोदशी १५|०५

नक्षत्र- शततारका ०८|०१

पूर्वा भाद्रपदा ३०|१६

रास-कुंभ २४|४६

योग-गंड

करण-तैतिल

दिनविशेष-चांगला दिवस

मेष

आपली रास खरंतर पैशाचा विशेष विचार करत नाही. खर्च करताना सुद्धा हात सैल असतो. आज मात्र पैसे येण्याचे योग आहेत. जुन्या गुंतवणुकी मधून फायदा होईल. बुद्धीने केलेली गुंतवणूक आज फळाला येताना दिसेल. दिवस चांगला आहे.

वृषभ

मनाची मौज करणे अशा गोष्टी आजकाल थोड्या मागे पडल्या आहेत. कामावर तुमच्याकडून विशेष मेहनत घेतली जाते. आजचा दिवस मेहनतीचे चीज होणार आहे. आपली वाहवा होईल. प्रगती आणि बढतीचे यश दिसत आहेत.

मिथुन

वैश्य प्रवृत्तीची असणारी आपली रास. बौद्धिक दर्जा सुद्धा चांगला आहे. आज व्यवसायामध्ये विशेष पराक्रम होईल. नव्याने ओळखी होतील. लांबच्या प्रवासाचे योग आहेत. विष्णू उपासना करावी.

कर्क

मनाशी वेगळा संवादास साधाल. गूढ गोष्टीं विषयीचे आकर्षण वाढेल. जुन्या काही उत्खननाच्या गोष्टी तुमच्याकडून आज घडतील. "शेंडी तुटो वा परंबी" प्रयत्न थकणार नाहीत.

सिंह

सरकारी कामे गतिशील होतील. जवळच्या लोकांचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. जोडीदाराचे कौतुक करावे लागेल. समजून घेतल्यास दिवस चांगला जाईल. पोशिंदेपण पत्करावे लागेल.

कन्या

मी आणि माझा असे करून फारसे काही साध्य होत नाही हे आपल्याला आता समजले आहे. सर्वांना बरोबर घेऊन चालणार आहात. आयुष्यात येणाऱ्या अडीअडचणींना आज मोकळी वाट मिळेल. मात्र शत्रूही वाढतील.

तूळ

विद्यार्थ्यांना कलाकारांना क्रीडा क्षेत्रात दिवस आज सुसंधी घेऊन आलेला आहे. विविध क्षेत्रातील यश पादाक्रांत करत जाल.कुटुंबीयांपासून धनयोगाचे संभव दिसतो आहे.

वृश्चिक

बैठा घराचे स्वप्न काही अंशी आज पूर्णत्वास येईल किंवा त्या निगडित घटना घडायला लागतील. प्रेमामध्ये मनस्ताप वाढेल. संततीसाठी खर्च आज करावा लागणार आहे.

धनु

निर्णय घेताना आज कचराई करू नका. काही वेळेला द्विधा अवस्थेमुळे आपण मागे पडता. नेटाने आणि जोमाने आज काम करावे. यश तुमचेच आहे. जिद्द आणि चिकाटी वाढती राहील. पत्रव्यवहार पार पडतील.

मकर

जोडीदाराच्या तब्येतीची आज काळजी घ्यावी. नको त्या गोष्टींमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. कुठेही साक्षीदार आज राहू नका. पैशाचे व्यवहार सुरळीत पार पडतील.

कुंभ

स्वतः विषयीचा एक वेगळा आत्मविश्वास बाळगाल. वायु तत्वाची बौद्धिक असणारी आपली रास आहे. एखाद्या वेगळ्या क्षेत्रामध्ये आज आपला प्रवेश होईल. इतरांना आपला सल्ला मोलाचा वाटेल.

मीन

ठरवून गोष्टी होत नाहीत. आज न ठरवता काही गोष्टी होतील पण त्याचा त्रासही होण्याची शक्यता आहे. परदेशगमन अशी निगडित बैठका असतील तर त्या अडचणीच्या ठरतील. सरकारी कामे शक्यतो दुपारनंतर केलेली बरी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, भायखळ्याजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड; मुंबईकडे येणाऱ्या लोकल खोळंबल्या| VIDEO

Bigg Boss 19: भैया से सैयां...; विकेंड का वारमध्ये सलमान खाननेच केली तान्या मित्तलची पोलखोल

Shocking News : रात्री झोपेतून उठवलं अन् गच्चीवर नेलं, १४ वर्षीय मुलीवर बलात्कार; नातेवाईकाचं भयंकर कृत्य

Katrina Kaif Age: पती विकी कौशलपेक्षा मोठी आहे कतरिना कैफ, दोघांच्या वयात किती आहे अंतर? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: पुण्यात अजित पवार यांची महत्त्वाची बैठक

SCROLL FOR NEXT