Surya Gochar saam tv
राशिभविष्य

Surya Gochar 2025: 24 तासांनंतर सूर्य उच्च राशीत करणार प्रवेश; 'या' राशींवर होणार पैशांचा पाऊस, नवी नोकरीही मिळणार

सूर्य सध्या मीन राशीत असून येत्या काळात तो मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे. यामुळे काही राशींचं आयुष्य चांगलं होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांचा राजा सूर्य देखील राशी परिवर्तन करतो. सूर्याच्या या गोचरचा परिणाम सर्व राशींच्या म्हणजेच १२ राशींवर होत असतो. सध्या सूर्य मीन राशीत असून २४ तासांनी तो मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे.

ग्रहांचा राजा सूर्यदेवाच्या गोचरमुळे काही राशींच्या व्यक्तींना नशीबाची चांगली साथ मिळू शकणार आहे. यावेळी तुमच्या कुटुंबामध्ये सुख-शांती असणार आहे. ज्यामुळे तुमच्या जीवनात अचानक आनंद येणार आहे. जाणून घेऊया यामध्ये कोणत्या राशींच्या व्यक्तींना या काळात अधिक लाभ मिळू शकणार आहे.

मेष रास

या राशीच्या लग्नाच्या घरात सूर्याचे भ्रमण होणार आहे. अशा परिस्थितीत या राशीखाली जन्मलेल्या लोकांना उच्च स्तरावर लाभ मिळू शकतात. कुटुंबियांसोबत चांगला वेळ घालवू शकाल. यासोबतच प्रेम जीवनही चांगलं राहणार आहे. शिक्षण क्षेत्रातही चांगले परिणाम मिळू शकतात.

मिथुन रास

या राशीत, सूर्य तिसऱ्या घराचा स्वामी असल्याने, लाभ घरात भ्रमण करणार आहे. लोकांना प्रत्येक क्षेत्रात भरपूर यश मिळू शकते. आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे. तुमच्या कामाचं कौतुक होऊ शकणार आहे. पगारवाढीसह पदोन्नतीची शक्यता आहे. तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकणार आहात.

सिंह रास

या राशीच्या लग्नाचा स्वामी असल्याने सूर्य भाग्य घरात प्रवेश करणार आहे. या राशीच्या लोकांसाठी नवव्या घरात सूर्याचे प्रवेश चांगला असू शकणार आहे. कामात बऱ्याच काळापासून सुरू असलेले अडथळे दूर होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुम्हाला इतरांचं सहकार्य मिळणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election: बिहारमध्ये ऐन वेळी बदलते आकडे; मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणारे तेजस्वी यादवांची केवळ 219 मतांची आघाडी|VIDEO

Maharashtra Live News Update: जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील केमिकल कंपनीला आग

IND vs SA: भारतीय टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली अशी घटना; कर्णधार शुभमनच्या निर्णयाने सर्वच आश्चर्यचकित

IPPB Recruitment: ग्रॅज्युएट आहात? इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी; अर्ज कसा करावा?

Bihar Election Result Live Updates: बिहारमध्ये भाजप प्रणित NDA ला यश, महाराष्ट्रातील नागपुरात जल्लोष

SCROLL FOR NEXT