Surya Gochar  Saam Tv
राशिभविष्य

Surya gochar: दिवाळीपूर्वी सूर्य-मंगळाने बनवला खास राजयोग; 'या' राशींच्या घरी येईल लक्ष्मी, घराची भरभराटही होईल

Aditya Mangal Raj Yoga before Diwali: यंदाची दिवाळी काही राशींसाठी केवळ प्रकाशाचा सण नसून, धन-समृद्धी घेऊन येणारी आहे. ग्रहांचा राजा सूर्य आणि ऊर्जेचा कारक मंगळ यांच्या विशिष्ट युतीमुळे दिवाळीच्या अगदी आधी एक अत्यंत शुभ आणि शक्तिशाली आदित्य मंगल राजयोग तयार होत आहे.

Surabhi Jayashree Jagdish

सूर्याने 17 ऑक्टोबर रोजी म्हणजेच धनत्रयोदशीच्या एक दिवस अगोदर आपल्या राशीत बदल केला होता. हे परिवर्तन तूळ राशीत झालं आहे. यावेळी या राशीत मंगल ग्रह देखील विराजमान आहे. त्यामुळे सूर्य आणि मंगळ यांच्या युतीमुळे अनेक राशींवर शुभ परिणाम होणार आहेत. या युतीमुळे आदित्य-मंगल राजयोग तयार होणार आहे.

आदित्य-मंगल राजयोगाचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येणार आहे. यामध्ये खासकरून वृषभ, मिथुन, कर्क आणि तूळ राशीच्या लोकांसाठी हा राजयोग लाभदायक ठरणार आहे. तूळ राशीत दोन्ही ग्रहांच्या येण्याने या राशीवर विशेष परिणाम होणार आहे. मंगळ ग्रह तुम्हाला ऊर्जा देणार आहे, तर सूर्य आत्मविश्वास वाढवणार आहे. व्यवसायात प्रगती होणार आहे. दिवाळीच्या काळात मागील वर्षापेक्षा जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे.

वृषभ राशी

वृषभ राशीच्या लोकांसाठी आदित्य-मंगल राजयोग खूप शुभ ठरणार आहे. या राशीतील लोकांना कामात अडचण येणार नाही आणि आपले टारगेट सहज साध्य होणार आहे. प्रमोशन आणि करिअरमध्ये प्रगती होण्याचे योग आहेत. व्यवसायिकांना अचानक नफा मिळण्याची शक्यता आहे.

मिथुन राशी

मिथुन राशीच्या लोकांसाठीही ही युती भाग्यदायक ठरणार आहे. त्यांच्या कामांमधील अडथळे दूर होणार आहेत. तर शेअर मार्केटमध्ये लाभ मिळण्याची शक्यता आहे. तरीही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. आत्मविश्वास वाढल्याने ऑफिसमध्ये अतिरिक्त जबाबदाऱ्या मिळू शकतात.

कर्क राशी

कर्क राशीच्या लोकांसाठी ही युती कौटुंबिक सुख आणि आनंद घेऊन येणार आहे. दिवाळीच्या दिवसात तुमच्या कानावर चांगली बातमी पडणार आहे. संबंध सुधारणार असून धनलाभ देखील होणार आहे. ऊर्जा वाढल्यामुळे सर्व कामं सुरळीत पार पडणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sidramappa Patil Passes Away : माजी आमदार आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचं निधन, ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Friday Horoscope : प्रियकराबरोबर बोलताना काळजी घ्याल; या राशींच्या व्यक्तींना दुरावा सहन करावा लागणार

Maharashtra Politics: विदर्भात राजकीय उलथापालथ! भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

Manoj Jarange Warns Ajit Pawar: तुम्हाला पश्चाताप करावा लागेल; मनोज जरांगेंचा थेट अजित पवारांना इशारा

पिपाणी गेली, तुतारी राहिली! शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आयोगाचा दिलासा

SCROLL FOR NEXT