Diwali 2025: 100 दिवसांनी दिवाळीला बनतोय दुर्मिळ योग; हंस-केंद्र त्रिकोण राजयोगाने घरी येणार लक्ष्मी, पदोपदी मिळणार पैसा

Impact of Raj Yog: हिंदू धर्मातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी (Diwali). ही केवळ दिव्यांची नाही, तर धन आणि समृद्धीची पूजा करण्याची वेळ असते. ज्योतिष शास्त्रानुसार, २०२५ च्या दिवाळीला एक अत्यंत शुभ आणि शक्तिशाली योग जुळून येत आहे
Diwali 2025
Diwali 2025saam tv
Published On

दिवाळीचा सण हिंदू धर्मात अत्यंत उत्साह, भक्तीभाव आणि आनंदाचा सण मानला जातो. हा सण अंध:कारावर प्रकाशाचा, असत्यावर सत्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचा प्रतीक मानला जातो. दिव्यांच्या प्रकाशाने उजळलेलं प्रत्येक घर आणि प्रत्येक अंगण याची माहिती देतं की, आपल्या जीवनात प्रेम, सकारात्मकता आणि सत्याचा प्रकाश सदैव कायम राहणार आहे. दिवाळीचा सण प्रभू श्रीराम अयोध्येला परतल्याच्या आनंदात साजरा केला जातो.

ज्योतिषशास्त्रानुसार, यावर्षीच्या दिवाळीत अनेक विशेष आणि शक्तिशाली योग निर्माण होणार आहे. असा संयोग अनेक दशकांनंतर येतो. त्यामुळे त्याचा परिणाम फक्त 12 राशींवरच नाही तर देश-विदेशातही मोठ्या प्रमाणात दिसू शकणार आहे.

Diwali 2025
Samsaptak Yog: सूर्य-चंद्राच्या युतीने बनला समसप्तक राजयोग; 'या' राशींवर अफाट राहणार लक्ष्मीची कृपा

ग्रह-नक्षत्रांची स्थिती अत्यंत प्रभावशाली असणार आहे. दिवाळीच्या दिवशी देवगुरु बृहस्पति कर्क राशीत विराजमान राहतील आणि ते हंस राजयोग, केंद्र-त्रिकोण राजयोग आणि गौर-शंकर योग निर्माण करणार आहेत. चंद्रमा कन्या राशीत शुक्रासोबत युती करून कलात्मक योग तयार करणार आहे.

तूळ राशीत सूर्य, मंगळ आणि बुध एकत्र येऊन त्रिग्रही योग आणि बुधादित्य राजयोग निर्माण करणार आहेत. गुरु आणि कन्या राशीत शुक्र यांच्या संयोगामुळे कुबेर योग तयार होणार आहे. शनि ग्रह मीन राशीत वक्री अवस्थेत राहतील आणि ते पूर्वाभाद्रपदा नक्षत्रात राहून गुरुच्या राशीत असणार आहेत. ज्यामुळे शनीचा सकारात्मक प्रभाव देखील जाणवणार आहे.

Diwali 2025
Mahalakshmi Yog: मंगळ-चंद्र बनवणार महालक्ष्मी राजयोग; ८ फेब्रुवारीपासून चमकणार 'या' राशींचं नशीब, लक्ष्मीचा आशीर्वाद राहणार

कुंभ रास (Aquarius Zodiac)

कुंभ राशीच्या लोकांसाठी दिवाळीचा काळ अत्यंत शुभ आणि लाभदायक ठरणार आहे. दीर्घकाळापासून अडकलेलं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि धन-संपत्तीमध्ये झपाट्याने वाढ दिसू शकते. शनि देव तुमच्या राशीपासून धन आणि वाणी भावात वक्री राहणार आहेत. त्यामुळे काही आर्थिक चढ-उतारानंतर स्थैर्य प्राप्त होईल. या काळात अडकलेले पैसे तुमच्या हाती येणार आहेत.

Diwali 2025
Horoscope: 'या' राशींना कधीच भासत नाही आर्थिक चणचण, लक्ष्मी मातेचा असतो आशीर्वाद

मिथुन राशि (Gemini Zodiac)

या काळात गुरु दुसऱ्या भावात आणि शनि दशम भावात वक्री राहणार आहे. गुरु तुमच्या राशीच्या कर्म आणि सप्तम भावाचे स्वामी बनून धनभावात प्रवेश करणार आहेत. जीवनातील अनेक क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल आणि लाभ मिळण्याची संधी आहे. नोकरी किंवा करिअरमध्ये विशेष यश दिसू शकते. गुंतवणुकीची संधी मिळून आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. तुमचा आध्यात्मिक कल वाढणार आहेत. वैवाहिक जीवनात मधुरता राहील आणि जीवनसाथीचे सहकार्य मिळणार आहे.

Diwali 2025
4 zodiac signs: बुधवारी व्यापार-शिक्षणात यश, अष्टमीला देवीची कृपा; जाणून घ्या लाभदायी 4 राशी

मीन रास (Pisces Zodiac)

दिवाळीत तयार होणारे शक्तिशाली राजयोग मीन राशीसाठी अत्यंत शुभ ठरू शकणार आहेत. जीवनात आनंदाचे क्षण येऊ शकतात. या राशीच्या लग्न भावात शनी वक्री राहणार आहे तर गुरु पंचम भावात असणार आहे. यामुळे दीर्घकाळापासून अडकलेली कामं पूर्ण होऊ शकणार आहेत. शिक्षणाच्या क्षेत्रातही उत्तम यश मिळू शकते.

Diwali 2025
4 zodiac signs: बुधवारी व्यापार-शिक्षणात यश, अष्टमीला देवीची कृपा; जाणून घ्या लाभदायी 4 राशी

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com