Shadashtak Yog saam tv
राशिभविष्य

Shadashtak Yog: सूर्य-गुरुच्या षडाष्टक योगामुळे 'या' राशी होणार मालामाल; 'या' राशींचं नशीब फळफळणार

Shadashtak Yog: 3 जानेवारी 2025 रोजी सूर्य आणि गुरु यांच्यामध्ये हा विशेष योग तयार होणार आहे. या योगामुळे अनेक राशींच्या आयुष्यात विविध क्षेत्रांमध्ये शुभ आणि अशुभ प्रभाव पडणार आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, नववर्षात अनेक योग तयार होणार आहेत. षडाष्टक योग ग्रहांच्या गोचरमुळे तयार होतो ज्यावेळी दोन ग्रह एकमेकांपासून 6व्या आणि 8व्या घरात स्थित असतात. 3 जानेवारी 2025 रोजी सूर्य आणि गुरु यांच्यामध्ये हा विशेष योग तयार होणार आहे. या योगामुळे अनेक राशींच्या आयुष्यात विविध क्षेत्रांमध्ये शुभ आणि अशुभ प्रभाव पडणार आहेत.

ज्योतिषांच्या मते, 2025 मध्ये 3 जानेवारी रोजी तयार झालेला सूर्य-गुरूचा षडाष्टक योग 3 राशींसाठी शुभ असणार आहे. हा योग त्यांच्या जीवनात धन, समृद्धी, करिअर आणि नातेसंबंधांसाठी सकारात्मक बदल घडवून आणणार आहे. या काळात कोणत्या राशींच्या व्यक्तींसाठी हा योग अधिक लाभदायक ठरणार आहे, ते पाहूयात.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्य-गुरूचा षडाष्टक योग या राशींसाठी लाभदायक ठरणार आहे. या संयोगाने पैशाशी संबंधित बाबींमध्ये प्रगती होणार आहे. नोकरीत वरिष्ठांकडून तुमची प्रशंसा होऊ शकते. व्यवसायात नवीन भागीदारी फायदेशीर ठरू शकणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. तुम्हाला समाजात मान-सन्मान वाढणार आहे.

धनु रास

धनु राशीच्या लोकांसाठी सूर्य-गुरूचा षडाष्टक योग त्यांच्या नेतृत्व कौशल्यात सुधारणा करणार आहे. गुरूच्या प्रभावाने संपत्तीचे नवे स्रोत उघडणार आहेत. यावेळी तुम्हाला नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. व्यवसायात नवीन योजना सुरू करण्यासाठी उत्तम वेळ आहे. जुन्या आजारांपासून आराम मिळेल. शिक्षक आणि वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळू शकणार आहेत.

मेष रास

सूर्य आणि गुरूचा षडाष्टक योग संपत्ती आणि समृद्धी वाढवून देणार आहे. या योगाच्या प्रभावाने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकणार आहे. करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकणार आहे. कौटुंबिक जीवन सुखकर होईल आणि कुटुंबात सुख-शांती नांदणार आहे. वडील आणि मोठ्या भावाचे सहकार्य तुम्हाला लाभणार आहे. तुमची ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढू शकतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुनेत्रा पवार मुख्यमंत्री व्हाव्यात, मंत्री छगन भुजबळांनी व्यक्त केली इच्छा, पाहा नेमकं काय म्हणाले?

Maharashtra News Live Update: अहिल्यानगरमधील करंजी घाटात दोन वेगवेगळ्या ठिकाणी ट्रकचे अपघात; वाहतूक ठप्प

State Cabinet Expansion: राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार,बंडखोर आमदारांची वर्णी लागणार

सोलापूरच्या राजकारणात भूकंप, ३ दिग्गजांचा शिंदेसेनेत प्रवेश, एकनाथ शिंदे म्हणाले...

...तरीही आशाताई खचल्या नाहीत; ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर राज ठाकरेंची पोस्ट

SCROLL FOR NEXT