Weekly Horoscope Saam Tv
राशिभविष्य

Weekly Horoscope: काही राशींना 'या' आठवड्यात आर्थिक लाभ होतील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

या आठवड्याचे राशीभविष्य (Weekly Horoscope) ११ ते १७ ऑगस्ट २०२५ या कालावधीसाठी आहे. ग्रह-नक्षत्रांची स्थिती पाहता हा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. विशेषतः धनलाभाच्या दृष्टीने काही राशींचे नशीब चमकेल. त्यांना अनपेक्षित आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे.

Surabhi Jayashree Jagdish

मेष

सप्ताहाची सुरुवात मोठे इच्छा पूर्ण करणारी राहील. मित्र-सहकारी यांच्याकडून मोठी मदत मिळेल. नवीन मित्र-मैत्रिणी भेटतील. मात्र उत्तरार्धात अनावश्यक खर्च होतील.

वृषभ

नोकरी-व्यवसायात मोठे बदल होतील. गुरू-चंद्र शुभ योगामुळे प्रमोशन, मोठे पद मिळेल. चंद्र- शुक्र शुभ योगामुळे पगारवाढ होईल. वरिष्ठांशी संबंध सुधारतील.

मिथुन

सप्ताहाच्या सुरुवातीला धार्मिक मंगलकार्य घडेल. गुरुजनांच्या गाठीभेटी होतील. धार्मिक-मंगल कार्यात सहभागी व्हाल. उत्तरार्धात नोकरी व्यवसायात कटकटी संभवतात.

कर्क

आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक लाभ सहज होतील. उत्तरार्धात धार्मिक विधी, तीर्थयात्रा होतील. मात्र काही महत्त्वाची कामे विलंबाने होतील. गुरुजनांशी मतभेद, समज-गैरसमज टाळावेत.

सिंह

तरुणांचे विवाह जमतील. भागीदारीच्या व्यवसायात मोठे लाभ होतील. उत्तरार्धात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. प्रवास जपून करावेत. वारसा हक्क, पेन्शनसारख्या कामात अडथळे, विलंब, मनस्ताप संभवतो.

कन्या

नोकरीमध्ये चांगले बदल होतील. हाताखालच्या लोकांचे उत्तम सहकार्य लाभेल. हितशत्रूवर विजय मिळेल. नोकरी-व्यवसायानिमित्त प्रवास होतील. उत्तरार्धात वैवाहिक जीवनात असमाधान निर्माण होईल.

तूळ

शेअर्ससारख्या व्यवसायात लाभहोईल. प्रेमप्रकरणातील गैरसमज दूर होतील. विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. उपासना, धार्मिक विधीतून आनंद मिळेल. उत्तरार्धात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

वृश्चिक

जागा, मालमत्तेच्या कामांतून मोठे लाभ होतील. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. घरातील वातावरण आनंद देणारे राहील. मात्र, उत्तरार्धात मुलांची चिंता निर्माण होईल. शेअर्ससारख्या व्यवसायात पैसे अडकतील.

धनू

भावंडे-नातेवाइकांचा सहवास लाभेल. सहली, तीर्थयात्रा होईल. भावंडांचे विवाह जमतील. उत्तरार्धात जागा-मालमत्तेच्या कामात अडथळे संभवतात. कोर्टकचेरीमध्ये मनस्ताप संभवतो.

मकर

कुटुंबात चांगले वातावरण राहील. नोकरीमध्ये पगारवाढ होईल. नवीन नोकरीची संधी मिळेल. भाडे-कमिशन यांतून अर्थार्जन होईल. उत्तरार्धात भावंडे-नातेवाइकांकडून मनस्ताप संभवतो. नियोजित प्रवास रद्द होतील. मानसिक स्वास्थ्य खराब राहील.

कुंभ

मनासारख्या घटना घडतील. संतती सौख्य लाभेल. मुलांकडून आनंदाची बातमी कळेल. आरोग्यात उत्तम सुधारणा होईल. शेअर्ससारख्या व्यवसायात मन लाभ होईल. प्रेमप्रकरणात यश मिळेल.

मीन

परदेशगमनाची संधी मिळेल. व्हिसा /पासपोर्टची कामे होतील. उंची वस्तू, वस्त्र, अलंकार, प्रवास, मनोरंजन, पार्टी, सहली यांसाठी मोठे खर्च होतील. मित्रांसाठी खर्च होतील. ओळखीच्या व्यक्तींना मदत कराल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narayan Rane: मोठी बातमी! नारायण राणे जसलोक रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?

Nanded Accident : गणेश भक्तांवर काळाचा घाला; भीषण अपघातात ३ जण जागीच ठार

Mumbai Konkan Ro Ro Ferry : तळकोकणात पोचा अवघ्या पाच तासात; आता मुंबई ते विजयदुर्ग रो-रो सेवा, VIDEO

Numerology: सप्टेंबर महिना 'या' मूलांकासाठी ठरेल लकी, स्वप्न होतील पूर्ण

Netflix Trending Films: नेटफ्लिक्सवर ट्रेंड होताहेत 'हे' सुपरहिट चित्रपट; भारतीय सिनेमाचांही समावेश, वाचा यादी

SCROLL FOR NEXT