Shatank Yoga 2025 saam tv
राशिभविष्य

Shatank Yoga: 12 मार्चपासून बनणार शुक्र-मंगळ बनवणार शतांक योग; 'या' 3 राशींवर बरसणार पाण्यासारखा पैसा

Shatank Yoga 2025: शुक्र आणि मंगळाच्या युतीमुळे एक अतिशय शुभ योग तयार होणार आहे. ज्यामुळे काही राशींचे भाग्य चमकू शकणार आहे. याशिवाय, या राशींना अचानक आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक पंचांगानुसार, ग्रह त्यांच्या हालचाली बदलतात. यावेळी सण आणि उत्सवांमध्ये ग्रहांच्या बदलामुळे शुभ योग निर्माण करतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो. होलिका दहन १३ मार्च २०२५ रोजी आहे. याच्या एक दिवस आधी, म्हणजे १२ मार्च रोजी एक शुभ राजयोग तयार होणार आहे.

शास्त्रानुसार, शुक्र आणि मंगळाच्या युतीमुळे एक अतिशय शुभ योग तयार होणार आहे. ज्यामुळे काही राशींचे भाग्य चमकू शकणार आहे. याशिवाय, या राशींना अचानक आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

सिंह रास

शतांक योग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. तुमच्या कामाचे कौतुक होणार आहे. या काळात तुमचे व्यक्तिमत्व सुधारण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते.

धनु रास

शतांक योगाच्या निर्मितीसह धनु राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळू शकणार आहे. शुक्राच्या प्रभावामुळे तुमचे आरोग्यही चांगले राहणार आहे. तुम्हाला तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. व्यावसायिकांना नवीन ग्राहक मिळू शकतात.

मेष रास

शतांक योगाची निर्मिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात बेरोजगारांना नोकरी मिळू शकतं. पदोन्नतीची शक्यता आहे. तुमच्या वडिलांशी तुमचे संबंध सौहार्दपूर्ण असतील. वडिलोपार्जित व्यवसाय करणाऱ्यांना मोठा नफा मिळू शकतो. गुंतवणुकीच्या दृष्टीनेही हा काळ शुभ आहे. तुम्हाला फायदेशीर सौद्यांची संधी मिळू शकते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT