Shukra Gochar 2023 Saam Tv
राशिभविष्य

Shukra Gochar 2024: शुक्र ग्रह जागा बदलणार; कुंभसह ५ राशींचं आर्थिक गणित बिघडणार

Shukra Gochar 2024: शुक्र ग्रह आपली राशी बदलणार आहे, त्यामुळे अनेक राशींना या फटका बसणार आहे. चला जाणून घेऊया त्या पाच अशुभ राशी कोणत्या आहेत, ज्यांना येणाऱ्या काळात विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागेल.

Bharat Jadhav

नऊ ग्रहांपैकी एक असलेल्या शुक्र ग्रह सौंदर्य प्रदान करत असतो. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शुक्र ग्रह असतो त्यांना कीर्ती, सन्मान, संपत्ती आणि सौंदर्य प्राप्त होते. वैदिक कॅलेंडरनुसार, २५ ऑगस्ट रोजी भगवान शुक्र आपली चाल बदलेल. रविवारी सकाळी ०१:२४ वाजता तूळ राशीचा स्वामी कन्या राशीत प्रवेश करेल. त्याआधी २२ ऑगस्टला सकाळी ८ वाजून ०७ मिनिटांनी शुक्र देव उ फाल्गुनी नक्षत्रमध्ये प्रवेश करतील. यामुळे पुढील २२ दिवस काही राशींसाठी अडचणींचे ठरणार आहेत.

या राशींना आर्थिक चणचण भासण्याची शक्यता आहे. काही राशीच्या लोकांवर शुक्राच्या अशुभ प्रभाव असेल. चला जाणून घेऊया, त्या पाच राशी कोणत्या आहेत, त्यांना २५ ऑगस्ट २०२४ पर्यंत विविध समस्यांना सामोरे जावे लागते.

कुंभ

या राशीमधील लोकांसाठी देखील हा काळ त्रासदायक ठरणार आहे. त्यामुळे या राशीतील जातकांनी पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्यात. ज्येष्ठांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे हानिकारक ठरू शकते. त्यामुळे येत्या काही दिवसांत आरोग्याची विशेष काळजी घ्या. विवाहित लोक आपल्या जोडीदाराच्या सुखसोयींवर जास्त खर्च करू शकतात, त्यामुळे आर्थिक ताण जाणवेल.

मकर

कामाच्या ठिकाणी अनावश्यक तणाव राहील, ज्यामुळे बॉसशी मतभेद देखील होऊ शकतात. आजच्या वादविवादाचा नोकरीवरही विपरीत परिणाम होऊ शकतो. नवीन व्यवहाराशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी व्यावसायिकांनी विचारपूर्वक विचार करावा, अन्यथा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. खरेदीसाठी हा काळ योग्य नसल्याचं ज्योतिषशास्त्रात सांगितलंय.

तूळ

तूळ राशीच्या लोकांनी यावेळी वैयक्तिक जीवनाशी संबंधित कोणताही निर्णय घेऊ नये. जर तुम्ही नवीन कार किंवा कोणतेही वाहन घेण्याचा विचार करत असाल तर हा विचार टाळा. नोकरदार लोकांचे कोणतेही प्रकरण न्यायालयात दीर्घकाळ चालू असेल तर त्यात तुमचा पराभव होऊ शकतो.

वृषभ

या राशीतील लोकांसाठी हा काळ खूप अडचणीचा ठरणार आहे. या राशीतील जातकांसाठी ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी वाद होऊ शकतो, ज्यामुळे तुमचा मूड दिवसभर खराब राहील. व्यावसायिकाचा एखादा महत्त्वाचा करार तुटण्याची शक्यता आहे.विवाहित लोकांच्या खर्चात वाढ झाल्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम होईल. अविवाहित लोकांचे भावासोबत काही विनाकारण वाद होऊ शकतात.

धनु

नवीन करार निश्चित करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा, अन्यथा आजच्या चुकीच्या निर्णयामुळे तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागू शकतो. नवीन वाहन खरेदीसाठी हा महिना शुभ नाही. धनु राशीच्या लोकांसाठी नवीन काम सुरू करण्यासाठी ही वेळ योग्य नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आबा बागुल यांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश

Kitchen Hacks : घरातील बाल्कनीत लिंबूचे झाड लावायचे असेल, तर या टिप्स नक्कीच वाचा

मतदानावेळी गोंधळ; शिंदे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, पोलिसांचा लाठीचार्ज|VIDEO

T20 World Cup Squad : शुभमन गिलचा पत्ता कट, २ वर्षांपासून संघाबाहेर असणाऱ्या खेळाडूची सरप्राईज एन्ट्री

Chutney Recipes: 2025 मध्ये जिभेचे चोचले पुरवणाऱ्या या 5 चटण्या, नवीन वर्ष सुरू होण्याआधी नक्की ट्राय करा

SCROLL FOR NEXT