Today's horoscope Saam Tv
राशिभविष्य

Today's horoscope: शुक्रवार शुभ! श्रवण नक्षत्र आणि शुभ योगाचा संयोग; ‘या’ राशींचं भाग्य जबरदस्त चमकणार

Shravan Nakshatra auspicious yog: भारतीय ज्योतिष आणि पंचांगानुसार, प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या नक्षत्राच्या आणि योगाच्या प्रभावाखाली असतो. आज, श्रवण नक्षत्राच्या संयोगाने एक 'शुभ योग' तयार झाला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आज १७ ऑक्टोबर २०२५ असून शुक्रवारचा दिवस आहे. शुक्रवार हा देवी लक्ष्मी आणि शुक्र ग्रहाचा कारक असल्यामुळे संपत्ती, सौंदर्य, प्रेम आणि सौहार्द यासाठी अत्यंत शुभ मानण्यात येतो. आजच्या दिवशी ग्रहांची मांडणी मानसिक शांतता, कौटुंबिक समृद्धी आणि आर्थिक वृद्धी यासाठी सहाय्यभूत आहे.

कशी आहे आज ग्रहांची स्थिती?

चंद्राचा प्रभाव भावनिक निर्णयांवर होऊ शकतो. त्यामुळे संयम राखून काम करणx फायदेशीर ठरेल. धार्मिक दृष्टीकोनातून आजचा दिवस स्त्रीशक्तीचा सन्मान, भक्ती आणि सौम्य आचरण यांना प्रोत्साहन देणारा आहे. योग्य मुहूर्त साधून पूजा, नव्या कामाची सुरुवात आणि खरेदी केली तर दीर्घकाळ लाभ होणार आहे.

आजचं पंचांग (१७ ऑक्टोबर २०२५)

  • वार- शुक्रवार

  • तारीख- १७ ऑक्टोबर २०२५

  • पक्ष- शुक्ल पक्ष

  • तिथी- दशमी

  • नक्षत्र- श्रवण नक्षत्र

  • योग- शुभ योग

  • करण- गर करण

  • सूर्योदय- सकाळी अंदाजे ६:२३

  • सूर्यास्त- संध्याकाळी अंदाजे ६:००

  • चंद्रोदय- रात्री अंदाजे २:१५

  • चंद्रराशी- मकर राशीत भ्रमण

शुभ मुहूर्त

  • अभिजित मुहूर्त: ११:५८ ते १२:४५

  • लाभकारी मुहूर्त: सकाळी ९:१५ ते १०:३०

  • गृहप्रवेश / नवीन कामाची सुरुवात: दुपारी १२:०० ते २:००

  • विवाह / साखरपुडा: आज सर्वसाधारण शुभ, परंतु ज्योतिष सल्ला आवश्यक

  • वाहन खरेदी: दुपारी १:०० ते ३:०० शुभ

  • देवी/लक्ष्मी पूजनासाठी सर्वोत्तम वेळ: संध्याकाळी ६:१५ ते ७:३०

  • आजची तिथीचे महत्व – दशमी

आज चार राशींना विशेष शुभफल

वृषभ रास

आजच्या दिवशी या राशींचं आर्थिक स्थैर्य वाढणार आहे. गुंतवणुकीत लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. प्रलंबित काम पूर्ण होणार आहे.

सिंह (Leo)

नेतृत्वगुण चमकणार आहेत. करिअरमध्ये मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढणार आहे. नवीन ओळखी फायदेशीर ठरणार आहेत

तूळ रास (Libra)

शुक्र ग्रहाचा प्रभाव असल्याने आजचा दिवस अत्यंत शुभ असणार आहे. प्रेमसंबंधात गोडवा येण्याची शक्यता आहे. व्यवसायिक करार फायदेशीर ठरणार आहे.

मकर (Capricorn)

चंद्र मकर राशीत असल्याने भावनिक स्थैर्य मिळणार आहे. धाडसी निर्णय घेता येऊ शकणार आहेत. नोकरीत प्रगतीची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Shocking : तोंडात कापडाचा बोळा कोंबला, हात-पाय रश्शीने बांधले; मुलाने आईला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics: भाजप मारणार एका दगडात दोन पक्षी? अजित दादांच्या गडाला भाजपचा सुरुंग

मुख्यमंत्र्यांच्या आईवर बोललो नाही, तू पंतप्रधानांच्या आईवर काय बोलला, दाखवू का? मनोज जरांगेंचं धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज

OBC Protest: एल्गार मोर्चाआधीच भुजबळांना धक्का?मोर्चाआधीच ओबीसी नेत्यांमध्ये फूट

Laxman Hake: ओबीसींसाठी आरक्षण संपलं! भुजबळांच्या मेळाव्याआधीच हाकेंचा एल्गार

SCROLL FOR NEXT