horoscope Saam tv
राशिभविष्य

Saturday Horoscope: डोकं शांत ठेवा, ५ राशींची होणार चांदीच चांदी; वाचा आजचे खास राशीभविष्य

Rashi Bhavisha : १२ राशींच्या व्यक्तींचा दिवस कसा असणार? जाणून घेण्यासाठी वाचा शनिवारचे खास राशीभविष्य

Sakshi Sunil Jadhav

मेष (Aries) : उद्याचा दिवस संयमाची परीक्षा घेणारा ठरणार आहे. कोणताही महत्त्वाचा निर्णय घाईत न घेता विचारपूर्वक घ्या. कुटुंबीयांच्या मदतीने कामे पूर्ण होतील.

वृषभ (Taurus): महत्त्वाच्या योजना पुढे नेण्यासाठी दिवस चांगला आहे. व्यवसाय आणि भागीदारीत चांगली प्रगती होईल. जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल.

मिथुन (Gemini): पैशाच्या बाबतीत सावधपणे निर्णय घेण्याची गरज आहे. आरोग्याची विशेष काळजी घ्या. अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शनाचा फायदा होईल.

कर्क (Cancer): मित्र आणि सहकाऱ्यांच्या मदतीने कामे वेगाने होतील. प्रेमसंबंध आणि वैयक्तिक आयुष्यात आनंददायी क्षण अनुभवता येतील.

सिंह (Leo): कुटुंबीयांकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. वादविवाद टाळून शांततेने काम करा. करिअर आणि व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे.

कन्या (Virgo) : व्यवसाय विस्तारासाठी दिवस चांगला आहे. धाडस आणि आत्मविश्वासामुळे महत्त्वाची उद्दिष्टे साध्य होतील. प्रवासाचेही योग आहेत.

तूळ (Libra): घरात आनंदाचे वातावरण राहील. मान-सन्मान आणि प्रतिष्ठेत वाढ होण्याची शक्यता आहे. जवळच्या व्यक्तींशी संबंध जास्त घट्ट होतील.

वृश्चिक (Scorpio): कार्यक्षेत्रात अपेक्षित यश मिळेल. सर्जनशीलता आणि कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. समाजात मान-सन्मान वाढेल.

धनु (Sagittarius): पैशाचा व्यवहार करताना घाई करू नका. भांडणांपासून लांब राहा. शिस्त आणि नियोजनामुळे कामे सुरळीत पार पडतील.

मकर (Capricorn): आर्थिक क्षेत्रात लाभदायक संधी मिळू शकतात. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. उत्पन्न वाढण्याचे संकेत आहेत.

कुंभ (Aquarius) : व्यवसाय आणि करिअरमध्ये सकारात्मक घडामोडी होतील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. नवीन संधी आणि प्रस्ताव लाभदायक ठरू शकतात.

मीन (Pisces) : भाग्याची साथ मिळाल्याने अनेक कामांमध्ये यश मिळेल. व्यवसायात प्रगती होईल आणि प्रवासाचेही योग आहेत. अपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ममता बॅनर्जींच्या पक्षाला मिळालं नवं नाव अन् चिन्ह; पक्ष-चिन्हाच्या लढाईत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: चंद्रपूरात शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसचा मोर्चा

Chanakya Niti: 'या' ५ गोष्टी आजच करा; समाजात मान-सन्मान मिळेल अन् सगळेच करतील आदर

Shocking: मध्यरात्री भयंकर घडलं! ड्युटीवर असलेल्या पोलिस अधिकाऱ्याला जागीच संपवलं, नेमकं काय घडलं?

Vastu Tips For Money: कपाटात पैसे ठेवण्याविषयीच्या 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

SCROLL FOR NEXT