Shash And Malavya Rajyog saam tv
राशिभविष्य

Shukra Gochar 2025: शनीचा शश आणि शुक्राचा मालव्य राजयोग करणार कमाल; 'या' राशींच्या व्यक्ती केवळ पैशांमध्ये खेळणार

Shani and Shukra Gochar Shash And Malavya Rajyog: येत्या काळात असंच एकाच वेळी दोन राजयोग तयार होणार आहेत. या काळात शुक्र आपल्या उच्च राशीत मीन राशीत प्रवेश करणार असून त्यामुळे मालव्य राजयोग तयार होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ग्रहांच्या राशीतील बदलामुळे राजयोगांची निर्मिती होते. मात्र वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, एकावेळी दोन राजयोगांची निर्मिती काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक असते. येत्या काळात असंच एकाच वेळी दोन राजयोग तयार होणार आहेत. या काळात शुक्र आपल्या उच्च राशीत मीन राशीत प्रवेश करणार असून त्यामुळे मालव्य राजयोग तयार होणार आहे.

याशिवाय कर्मफल देणारे शनिदेव देखील २८ जानेवारी २०२५ रोजी कुंभ राशीत विराजमान होणार आहेत. आता शनिदेवाच्या या स्थितीमुळे शश राजयोग तयार होणार आहे. या दोन्ही राजयोगांचा प्रभाव सर्व 12 राशींवर दिसून येण्याची शक्यता आहे. परंतु अशा काही राशी आहेत ज्यांच्यावर या राजयोगांचा सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.

या दोन्ही या तीन राशींचे नशीब पूर्णपणे चमकू शकते. करिअरपासून व्यवसायापर्यंत, प्रगती आणि पैसा कमावण्याच्या अफाट संधी स्थानिकांसाठी खुल्या होऊ शकणार आहे. याशिवाय काही राशींच्या आयुष्यात अचानक काही व्यक्ती येणार आहेत, ज्यांच्यामुळे त्यांचं आयुष्य बदलणार आहे.

वृषभ रास

मालव्य आणि शश राजयोग तयार झाल्याने वृषभ राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. लोकांना नोकरी आणि व्यवसायात अनपेक्षित प्रगती साधता येण्याची शक्यता आहे. बेरोजगारांना अचानक नोकरीच्या संधी खुल्या होऊ शकतात. या लोकांना नोकरीत बढती मिळू शकते. संपत्ती वाढल्यामुळे बँक बॅलन्स वाढू शकण्याची शक्यता आहे.

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी शश आणि मालव्य राजयोग फायदेशीर ठरू शकणार आहेत. या काळात तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. रखडलेली कामं आणि व्यवसाय पूर्ण होऊ शकतात. लोकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात अपार यश मिळू शकते. यावेळी कुटुंबात आनंदाचे वातावरण असू शकणार आहे. अर्थव्यवस्थेत पूर्वीपेक्षा बरीच सुधारणा दिसून येणार आहे. तुमचा जोडीदार आणि भावंडांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य करणार आहे.

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठी शश आणि मालव्य राजयोग विशेष लाभ घेऊन येणार आहे. या काळात आत्मविश्वास वाढल्याने धैर्य देखील वाढू शकते. या राशीच्या लोकांची प्रलंबित कामं पूर्ण होणार आहेत. संपत्ती वाढल्याने व्यवसायातील अडथळे दूर होण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांना पदोन्नतीचा लाभ होऊ शकणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Amarnath Yatra Bus Accident : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT