Shadashtak Yog saam tv
राशिभविष्य

Shadashtak Yog: षडाष्टक योगाच्या निर्मितीमुळे 'या' राशींवर घोंगावणार संकट; पैशांची फसवणूक होण्याची शक्यता

Shadashtak Yog: बुध आणि गुरु यांनी षडाष्टक योग तयार केलाय. जेव्हा दोन ग्रह एकमेकांपासून 150 अंशाच्या कोनात असतात तेव्हा ज्योतिष शास्त्रात त्याला षडाष्टक योग म्हणतात.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ज्यावेळी एकाच राशीमध्ये दोन ग्रहांची युती निर्माण होते, त्यावेळी योग निर्माण होतात. 16 जानेवारी 2025 रोजी संध्याकाळी 6:19 वाजता बुध आणि गुरु यांनी षडाष्टक योग तयार केलाय. जेव्हा दोन ग्रह एकमेकांपासून 150 अंशाच्या कोनात असतात तेव्हा ज्योतिष शास्त्रात त्याला षडाष्टक योग म्हणतात.

बुध आणि गुरू यांसारख्या महत्त्वाच्या ग्रहांचा षडाष्टक योग असेल तेव्हा त्याचा प्रभाव अधिकच गडद होतो. अनेकदा या योगाचा प्रभाव चांगला नसतो. याचं कारण म्हणजे कुंडलीच्या सहाव्या आणि आठव्या घरात ग्रह असतात. या घरांमध्ये शुभ ग्रह बसणं चांगले मानलं जात नाही. 16 जानेवारी रोजी बनलेल्या बुध आणि गुरूच्या या युतीचा परिणाम काही राशींच्या व्यक्तींवर नकारात्मक होणार आहे. यामध्ये कोणत्या राशी आहेत ते जाणून घेऊया.

मिथुन रास

बुध-गुरू षडाष्टक योगाचा मिथुन राशीवर खोल प्रभाव पडण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे स्रोत स्थिर राहणार नाहीत. यावेळी अनियोजित खर्च वाढण्याची शक्यता आहे. दैनंदिन कामही नीट होणार नाही. व्यावसायिक जीवनात प्रगती मंद असू शकते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. घरामध्ये काही गोष्टींवरून तणाव होऊ शकतात.

कन्या रास

बुध ग्रहाच्या प्रभावामुळे कन्या राशीवर या योगाचा प्रभाव कामाच्या ठिकाणी, आरोग्यावर दिसून येणार आहे. अवांछित खर्चामुळे आर्थिक परिस्थितीवर दबाव वाढू शकणार आहे. प्रत्येक पैसा खर्च करण्यापूर्वी तुम्हाला विचार करावा लागणार आहे. कामाच्या दरम्यान तुम्ही वारंवार विचलित होऊ शकता. जोडीदाराशी मतभेद वाढू शकतात. नात्यात अंतर आणि गोंधळ होण्याची शक्यता आहे.

मीन रास

बुध-गुरूच्या षडाष्टक योगामुळे मीन राशीच्या लोकांच्या जीवनात अनेक बाबींमध्ये असंतुलन निर्माण होऊ शकते. नियोजित गुंतवणूक करण्यास असमर्थता असणार आहे. पैसे मिळवण्याचे प्रयत्न अयशस्वी होऊ शकतात. नवीन जबाबदाऱ्या मिळण्यास विलंब होणार आहे. या काळात चिंता आणि नैराश्य वाढू शकतं. प्रवासात अडथळे किंवा अनपेक्षित अडथळे येणार आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : केबिनचा दरवाजा लावला,कपडे काढायला सांगितले अन्... उपचारासाठी आलेल्या महिलेसोबत डॉक्टरचे अश्लील कृत्य

Maharashtra Live News Update : वाशिममध्ये शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला

Dahi Puri Recipe: मुंबईची स्पेशल चटपटीत दही पुरी कशी बनवायची? सोपी रेसिपी वाचा

Summer Hairstyles: उन्हाळ्यात घामामुळे केस खराब होतात? या 5 ट्रेंडी हेअरस्टाईल्स करा

Baramati By Election : बारामती पोटनिवडणुकीसाठी मोठ्या हालचाली; शरद पवार मैदानात?, VIDEO

SCROLL FOR NEXT